मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी २२, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
दांडी बहाद्दर तलाठ्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई निलेश चाळक बी़ड तलाठ्यांच्या एकाधिकारशाहीच्या कारभाराची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून आत्ता दांडी बहाद्दर तलाठ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई करणार असल्येचे पत्रक महसुल विभागाने जाहीर केले आहे याबाबत अधिक माहीती अशी कि   तालुक्याच्या व जिल्हाच्या ठिकाणाहून हस्तकांमार्फत सज्जाचा कारभार करणार्‍या तलाठय़ांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात महसूल विभागाने एक पत्रक जारी केले असून या निर्णयामुळे कामाच्या नावाखाली दांड्या मारणार्‍या तलाठय़ांमध्ये खळबळ उडाली आहे.महसूल प्रशासन आणि जनतेमधील दुवा म्हणून तलाठीपद ग्राम पातळीवरचे महत्वाचे पद आहे. गावच्या अडचणी गावातच सुटल्या जाव्यात यासाठी तलाठी हा गावातच राहणे बंधनकारक आहे. पण बहुतांश तलाठी हे नेमणुकीच्या गावी राहात नसल्याच्या तक्रारी झाल्या होत्या या तक्रांरीची महसूल विभागाने दखल घेतली आहे व तसेच अनेक तलाठी हे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी राहूनच ते मध्यस्थामार्फत सज्जाचे कामकाज पाहत असतात. त्यामुळे गावकर्‍यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याबाबत जनतेतून वा