मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर ७, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. नाशिक : शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. येवला तालुक्यातील कोटमगावात सुभाष कोटमे यांची तीन एकर शेती आहे. या तीन एकरात ते कांदा, ऊस, टोमॅटो अशी पीकं घेतात. काही वर्षांआधी त्यांना टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर काकडीचं उत्पादन घेणारी शेतं पाहिली. तेव्हा आपल्याही शेतात हा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे गेली आठ ते 10 वर्ष ते काकडीचं उत्पादन घेतात. यंदा तीन महिन्याआधी त्यांनी तीन एकरात काकडीची लागवड केली. आणि ही लागवड त्यांना लाखोंचा नफा देणारी ठरली.
data-language="en"> बीडमधील 'न्यूटन', चप्पूवरुन नदी पार करत मतदारांची नोंदणी बीड  :  निवडणूक आयोगाच्या कामाला आम्हाला जुंपलं जातं, अशी ओरड शिक्षकांकडून होत असते. अनेकदा तर हे काम टाळतानाही शिक्षक आढळून येतात. अशी स्थिती एकीकडे असताना बीडमधील एका शिक्षकाने वेगळा पायंडा पाडला आहे. नुसता पायंडाच नव्हे, तर एक आदर्श निर्माण केला आहे. ‘न्यूटन’ सिनेमात अभिनेता राजकुमार राव हा नक्षलवादी भागात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जीव धोक्यात टाकतो. तसेच काहीसे बीडमधील संदीप पुरी या शिक्षकाने जीव धोक्यात टाकून  निवडणूक प्रक्रियेत लोकसहभागासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक म्हणजे लोकशाही भक्कम करण्याचं माध्यम. याच निवडणुकीची सर्व कामं पाहणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वतोपरी मदत सरकारी शाळांमधील शिक्षक करत असतात. मतदार याद्यांपासून ते मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणापर्यंत, बहुतेक कामांमध्ये शिक्षक मदत करतात. मात्र अनेक ठिकाणी काही शिक्षक या कामांना नकार देतात, हे आमचं काम नसल्याचेही सांगतात. बीडमधील एक शिक्षक मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत, एक प्रेरणादायी