मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे ६, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दारू दुकान आणि बार मध्ये दर फलक न लावता जादा दराने विक्री

दारू दुकान आणि बार मध्ये दर फलक न लावता जादा दराने विक्री - अधिक्षकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - अँड. अजित देशमुख               बीड ( प्रतिनिधी ) कायद्यातील तरतूद आणि आयुक्तांचे आदेश याला हरताळ फासत जिल्ह्यात देशी दारू आणि बिअर बार चालक ग्राहकांना जादा दराने दारू विकत आहेत. ही बाब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांना माहित आहे. मात्र ते कोणतीही कारवाई करत नाहीत. दारू विक्रेते आणि अधिकारी यांच्यामध्ये काय साटेलोटे आहे, हे सांगता येत नाही. मात्र कायद्याचे उल्लंघन होत असताना अधीक्षक आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. यातून दारूड्यांची संख्या वाढत असून गोर गरीब कुटुंब उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे अधीक्षकांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल, असा इशारा जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.              एकीकडे नवीन दारू दुकान परवाने मागणाऱ्या फाईल हातोहात पळत असताना दुसरीकडे अवैध दारू विक्री बाबत मौन पाळले जात आहे. अवैध आणि जादा दराने होणारी विक्री  सरकारी अधिक