जिरेवाडी येथून हुंडा निर्बंध याञ्ञेस प्रारंभ बीड- महाराष्ट्रासह देशभरात आणि विशेषता मराठवाड्यात हुंड्यापाई अनेक तरूणीचे उध्वस्त झाले आहेत आणि या हुंडा देण्या घेण्याच्या अडचणीमुळे अनेक तरूणीनी आपली जीवनयाञा संपवली आहे त्यामुळे या गोष्टी कुठे तरी थांबाव्यात म्हणून आक्का फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यात हुंडा निर्बंध याञेचे आयोजन करण्यात आले आहे आणि या हुंडा निर्बंध याञेचा प्रांरभ जिरेवाडी येथून झाला आहे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील शितल वायाळ या मुलीने हुंडा देण्यासाठी वडिंलाकडे पैसे नसल्याने आत्महत्या केली होती त्यामुळे या दुर्दैवी घटनेमुळे हुंडाबंदीचा प्रशन पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे त्यामुळे कुठे ना कुठे तरी हे प्रकार थाबावेत यासाठी अँड स्वाती नखाते या हुंडा निर्बंध याञेचे आयोजन केले होते आणि या सदरील हुंडा निर्बंध याञेस जिरेवाडी येथून प्रारंभ करण्यात आला आणि जिरेवाडी येथून साडे आठ वाजता या हुंडा निर्बंध याञेस प्रारंभ करण्यात आला आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिरेवाडीचे माजी सरंपच तथा ग्रां,प सदस्य बंडू मोहीते, उपसंरपच सर्जेराव मोहीते,आणि गावातील जेष...