मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी २३, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
टिक टिक वाजते डोक्यात... धड धड वाढते ठोक्यात  निलेश चाळक बीड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने 16 फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या कुठे मतदानाचा टक्का वाढला तर कुठे घटला.  सर्वच उमेदवारांकडून संभाव्य मतदानाच्या आकडेमोडला मोठा वेग आला आहे.  कोणाला किती मतदान झाले हे  निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे, त्यातून उमेदवाराच्या विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे. जसजशी निकालाची तारीख उद्यावर आली आहे आहे तस तशी उमेदवारांची अवस्था टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात काहीशी अशी झाली आहे.मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वत्र शांततेत पार पडल्या. अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.   काही नवख्यांचे राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे. निवडणूक काळात प्रचार सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते यात सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या. प्रत्येक उमेदवारांकडून मतदारराजाचे मन जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी आश्‍वासनाची बरसात करावी लागली होती.  निवडणुका अधिकच रंगतदार