data-language="en"> अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे उपोषण आष्टी : तालुक्यातील मौजे सोलापूरवाडी येथे गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेले असून ते अतिक्रमण हटविण्यात येवून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी सोमवारपासून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव थोरवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. मौजे सोलापुरवाडी येथील गायरान जमिन स.नं.१० क्षेत्र १०८ एक्कर या जमिनीमध्ये अतिक्रमण होत आहे. वन विभाग व जिल्हाधिकारी यांना अर्ज करून बरेच दिवस झाले तरी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. संबंधित जमिनीवरील लाखो रूपयांचे झाडे चोरून तोडली जात आहेत. लोंढे नामक पोलिस कर्मचार्याने ६ एक्कर जमिनीवर अतिक्रमण केले असून ग्रामस्थांचे शेतात जाणारे रस्ते बंद केले आहेत. विचारणा केली असता दमदाटी करण्यात येत असून अॅट्रासिटी दाखल करू अशी धमकी दिली जात आहे. गावातील दोन पुरूष व एका महिलेवर अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोपही थोरवे यांनी निवेदनातुन...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619