मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
औरंगाबादमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना घरात अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबादच्या आपत भालगावमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं.     औरंगाबाद :   कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना घरात अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबादच्या आपत भालगावमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं. एका जागरूक महिलेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गर्भपात केंद्रावर छापा टाकला. यावेळी वैद्यकीय पदवी नसलेली महिला सर्रास गर्भपात करत असल्याचं पोलिसांच्या चौकशीदरम्यान उघड झालं. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं असून, ललिता खाडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तसंच गर्भपातासाठी तक्रारदार महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या सासू-सासऱ्यांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवप्रताप दिनाचा उत्साह, प्रतापगडावर विविध कार्यक्रम या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सातारा : छत्रपती शिवाजी राजेंच्या शौर्याच्या गाथा सांगणारा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन… या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. एकीकडे गडावरच्या कार्यक्रमाची लगबग सुरु असताना दुसरीकडे मात्र आज सकाळी संपूर्ण प्रतापगड हा धुक्यात हरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. या गडासोबत या भागातील संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा ही धुक्यात हरवल्या होत्या. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातलं, तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगापैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध आहे. त्यानिमित्तच प्रतापगड उत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा केला जातो. ी उपस्थित केलेल्या वादानंतर हा उत्सव आता सरकारच्या वतीने साजरा केला जातो.