खेड्यापाड्यातल्या एकेकटीची लढाई...‘एकल महिला आणि पाणीप्रश्न’ या अभ्यासानं समोर आलेलं ग्रामीण भागातील महिलांचं एक वास्तव ग्रामीण भागात एकेकट्या राहणाºया, एकल महिला कशा जगतात? आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पत्नींसह परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित अशा एकल महिलांच्या जगण्यात दुष्काळानं कोणत्या समस्या निर्माण झाल्या. हिमतीने जगता जगता कुठले नवे प्रश्न त्यांना छळू लागले, हे शोधणारा एक अभ्यास. ऋचिका सुदामे- पालोदकर मराठवाड्याला गेली काही वर्षे दुष्काळानं छळलं. माणसांना जगणं नको केलं, काहींनी स्थलांतर पत्करलं. मोठ्या शहरात लेकराबाळांसह कुटुंब गेली. कुठं कुठं रस्त्यावर आणि वस्त्यांत राहू लागली. जे तेही करू शकले नाही त्यांच्याभोवतीचा दुष्काळ तर जास्तच जीवघेणा. त्यात काही शेतकºयांनी स्वत:ला विषाच्या बाटलीत संपवलं कुठं गळफास लागले. पोरंबाळं पदरात असलेली एकेकटी बाई मागे उरली. तिला तर लेकरांसाठी जगणं भागच होतं. उभं राहणं भाग होतं. तशा अनेकजणींनी संसार सांभाळले, कच्चीबच्ची जगतील म्हणून हिंमत धरली. काहींनी पुन्हा शेती सुरू केली, काहींनी काही उद्योग स्वीकारले. कधी त्यांच्या हिमती...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619