मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
‘लग्नासाठी स्थळ शोधताना अपेक्षा मर्यादित ठेवा’ जळगाव - लग्नासाठी स्थळ शोधत असताना अपेक्षा मर्यादित ठेवा जेणेकरून चांगले सगेसोयरे मिळतील, असा सल्ला आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. लेवा नवयुवक संघटनेतर्फे रविवारी (दि. २६) लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत हाेते. स्त्री-पुरुषांच्या जन्मदरातील तफावतीमुळे लग्नासाठी मुली मिळत नाही. यातच मुलींकडून नवरदेव शोधत असताना त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पाल् यांचे वय निघून गेल्यानंतर त्यांचे लग्न होत नाही, असेही खडसेंनी सांगितले. रविवारी (दि. २६) आयोजित करण्यात आलेल्या आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महामेळाव्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर लेवा पाटीदार समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित, शेतकरी, व्यावसायिक विवाहेच्छू युवक युवतींनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवापंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महापौर ललीत कोल्हे, जिल्हा सरकारी वकील