स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन काळाच्या पडद्याआड निलेश चाळक बीड - स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागात २० ते २५ वर्षापुर्वी घराघरात दिसणारे जुन्या पद्धतीचे काळे दूरध्वनी आता दिसतच नाहीत. त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाईल मुळे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन मात्र काळाच्या पडद्याआड जात असल्याचे दिसून येत आहे आत्ता ग्रामीण भागात जो तो मोबाइल वापरत आहेयाबाबत अधिक माहीती अशी कि २० ते २५ वर्षापुर्वी ग्रामीण भागात अख्ख्या गावात एकाच घरी फोन असायचा. त्यावरही क्वचितच फोन यायचा. सहज कुणीच कुणाला फोन करायचं नाही. अगदी महत्त्वाचं काम असेल तरच फोन व्हायचा. आणि तेही कामाचं बोलून झाल्यावर फोन लगेच बंद केला जायचा. तरीही कुणाचं काहीच अडायचं नाही. उलट जर अपरात्री फोन वाजला की भीतीच वाटायची. वस्तीत ज्यांच्या घरी फोन असायचा ते चांगलेच शेखी मिरवायचे. आपल्याला फोन वापरायला मिळावा म्हणून इतर शेजारीही अशांना लग्गा लावायचे परंतू आत्ता ग्रामीण भागात अशी परिस्थिती नाही प्रत्येकाच्या घरी सगळ्या जवळ स्मार्ट फोन ,मोबाईल आहेत त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाई...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619