मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
ट्रेनमध्ये महिला प्रवाशांची दादागिरी, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मारहाण नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. विरार : विरार ट्रेन आणि दादागिरी हे जणू समीकरणच बनलं आहे. ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या टोळक्याची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. सीटवर बसण्याच्या कारणावरुन तीन महिला प्रवाशांनी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सपना मिश्रा (वय 19 वर्ष) असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बोईसर इथल्या थीमस इंजिनीअर कॉलेजमध्ये शिकते. नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. बुधवारी सकाळी विरार रेल्वे स्थानकातून 7.55 ची इंटरसिटी एक्स्प्रेस पकडून ती आईसोबत बोईसरला जात होती. परंतु सीटवर बसल्याच्या कारणावरुन तिला तीन महिला प्रवाशांनी मारहाण केली. लिसांनी तिचा जबाब नोंदवला असून चौकशी करुन महिलांविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं
देशभरातील शेतकऱ्यांचं 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते.   नवी दिल्ली :  सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारविरोधात राजधानीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी एकवटण्याचा निर्धार केला आहे. हमीभावासंदर्भात 20 नोव्हेंबरला देशभरातले शेतकरी दिल्लीत धडक देणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीनं हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप दिलं जाणार आहे.