मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री

काळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री नागपूर: उद्योजकांना काळजी करण्याचं कारणं नाही कारण 2019 मध्ये लोक मलाच संधी देतील. त्यामुळं उद्योगांना सवलतीत वीज मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९ मध्ये उद्योगांसाठी असलेल्या सवलती संपणार आहेत. या धोरणांमध्ये कमी वीज दरासह अनेक सवलती यात देण्यात आल्या आहेत. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. नविन औद्योगिक धोरणाचा विदर्भ आणि मराठवाड्यावा मोठा फायदा होणार. देशात एकूण जेवढी परकीय गुंतवणूक झाली त्यातली ४७ टक्के महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राचं धोरण उद्योग स्नेही असल्यामुळेच ही गुंतवणूक आकृष्ट झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यक्रमात अनेक उद्योगपतींनी आपल्या भाषणात शंका उपस्थित केली होती. 2019 मध्ये या सवलती संपणार असून त्याच वर्षी निवडणुकाही आहेत. त्यामुळे या सवलती कायम राहणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. उद्योगपती

दारू दुकान आणि बार मध्ये दर फलक न लावता जादा दराने विक्री

दारू दुकान आणि बार मध्ये दर फलक न लावता जादा दराने विक्री - अधिक्षकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - अँड. अजित देशमुख               बीड ( प्रतिनिधी ) कायद्यातील तरतूद आणि आयुक्तांचे आदेश याला हरताळ फासत जिल्ह्यात देशी दारू आणि बिअर बार चालक ग्राहकांना जादा दराने दारू विकत आहेत. ही बाब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांना माहित आहे. मात्र ते कोणतीही कारवाई करत नाहीत. दारू विक्रेते आणि अधिकारी यांच्यामध्ये काय साटेलोटे आहे, हे सांगता येत नाही. मात्र कायद्याचे उल्लंघन होत असताना अधीक्षक आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. यातून दारूड्यांची संख्या वाढत असून गोर गरीब कुटुंब उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे अधीक्षकांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल, असा इशारा जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.              एकीकडे नवीन दारू दुकान परवाने मागणाऱ्या फाईल हातोहात पळत असताना दुसरीकडे अवैध दारू विक्री बाबत मौन पाळले जात आहे. अवैध आणि जादा दराने होणारी विक्री  सरकारी अधिक
बीडमधील मराठा आरक्षण जनसुनावनीस मराठा बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :-कुंदाताई काळे बीड-:दिर्घकाल टिकणारे मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर मराठा समाजाचं आर्थिक , सामाजिक मागसलेपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या निदर्शनास आणून देणे अत्यावश्यक आहे . याचसाठी राज्य मागासवर्ग आयोग राज्यात सर्वत्र जनसुनावणी आयोजीत केली असून ही सुनावणी 8 तारखेला बीड मध्ये होणार आहे तरी बीड जिल्ह्यातील मराठा बांधवानी मराठा आरक्षण जनसुनावनीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या कुंदाताई काळे यांनी केले आहे . व तसेच अगोदर मराठा समाजात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीचा छापील नमुना तयार केला असून त्यात कौटुंबिक , शैक्षणिक तसेच अन्य माहिती भरावयाची आहे .  सामुहिक आणि  वैयक्तिक स्वरुपात  आयोगाला ही  माहिती सादर करावयाची आहे .  यासाठी तालुक्यातील तसेच प्राधान्यक्रमांच्या गावातील युवक , संघटनांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर माहिती कशी भरावी याबद्दल सखोल माहिती घेणे क्रमप्राप्त आहे , जेणेकरुन तालुका