काळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री नागपूर: उद्योजकांना काळजी करण्याचं कारणं नाही कारण 2019 मध्ये लोक मलाच संधी देतील. त्यामुळं उद्योगांना सवलतीत वीज मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९ मध्ये उद्योगांसाठी असलेल्या सवलती संपणार आहेत. या धोरणांमध्ये कमी वीज दरासह अनेक सवलती यात देण्यात आल्या आहेत. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. नविन औद्योगिक धोरणाचा विदर्भ आणि मराठवाड्यावा मोठा फायदा होणार. देशात एकूण जेवढी परकीय गुंतवणूक झाली त्यातली ४७ टक्के महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राचं धोरण उद्योग स्नेही असल्यामुळेच ही गुंतवणूक आकृष्ट झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यक्रमात अनेक उद्योगपतींनी आपल्या भाषणात शंका उपस्थित केली होती. 2019 मध्ये या सवलती संपणार असून त्याच वर्षी निवडणुकाही आहेत. त्यामुळे या सवलती कायम राहणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. उद्योगपती...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619