मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै १२, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
वर्षांभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत...! निलेश चाळक बीड मो ,९७६७८४६१९ देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला,   मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' मात्र वर्षभरनतंर ही  न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कधी मिळणार कोपर्डीतील श्रध्दाला न्याय ? असा सवाल आत्ता  उपस्थित होत आहे , महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ईतिहासात तेरा जूलै हा काळाकुट दिवस आहे या दिवसाने मराठ्यांना मराठा समाजाला हादरवून टाकले होते आणि संवेदनशिल मनं हेलावून टाकली होती परंतू या ढिम्म सरकारमुळे कोपर्डीतील मराठा ताईला न्याय मिळाला नाही आज कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना फाशीची शिक्षा झालेली नाही ज्यावेळी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिली होती त्यावेळी मु्यमंञी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि आरोपीना सहा महीण्याच्या आत फाशीची शिक्षा दिली जाईल परंतू अद्याप ही कोपर्डीतील आरोपीना शिक्षा नाही