मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. नाशिक : शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. येवला तालुक्यातील कोटमगावात सुभाष कोटमे यांची तीन एकर शेती आहे. या तीन एकरात ते कांदा, ऊस, टोमॅटो अशी पीकं घेतात. काही वर्षांआधी त्यांना टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर काकडीचं उत्पादन घेणारी शेतं पाहिली. तेव्हा आपल्याही शेतात हा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे गेली आठ ते 10 वर्ष ते काकडीचं उत्पादन घेतात. यंदा तीन महिन्याआधी त्यांनी तीन एकरात काकडीची लागवड केली. आणि ही लागवड त्यांना लाखोंचा नफा देणारी ठरली.
data-language="en"> बीडमधील 'न्यूटन', चप्पूवरुन नदी पार करत मतदारांची नोंदणी बीड  :  निवडणूक आयोगाच्या कामाला आम्हाला जुंपलं जातं, अशी ओरड शिक्षकांकडून होत असते. अनेकदा तर हे काम टाळतानाही शिक्षक आढळून येतात. अशी स्थिती एकीकडे असताना बीडमधील एका शिक्षकाने वेगळा पायंडा पाडला आहे. नुसता पायंडाच नव्हे, तर एक आदर्श निर्माण केला आहे. ‘न्यूटन’ सिनेमात अभिनेता राजकुमार राव हा नक्षलवादी भागात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जीव धोक्यात टाकतो. तसेच काहीसे बीडमधील संदीप पुरी या शिक्षकाने जीव धोक्यात टाकून  निवडणूक प्रक्रियेत लोकसहभागासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक म्हणजे लोकशाही भक्कम करण्याचं माध्यम. याच निवडणुकीची सर्व कामं पाहणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वतोपरी मदत सरकारी शाळांमधील शिक्षक करत असतात. मतदार याद्यांपासून ते मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणापर्यंत, बहुतेक कामांमध्ये शिक्षक मदत करतात. मात्र अनेक ठिकाणी काही शिक्षक या कामांना नकार देतात, हे आमचं काम नसल्याचेही सांगतात. बीडमधील एक शिक्षक मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत, एक प्रेरणादायी
nilesh chalak beed nilesh chalak beed data-language="en"> बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा बीड : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. ८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे. १ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
data-language="en"> राज्यात सर्व ठिकाणी मराठी अनिवार्य, शासन निर्णय जारी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई :  केंद्र शासनाची कार्यालये, बँका, टपाल, दूरध्वनी कंपन्या, विमा कंपन्या, कर विभाग, रेल्वे, मेट्रो – मोनो, विमानसेवा, गॅस, पेट्रोलियम या ठिकाणी मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी आणि हिंदीनुसार मराठी भाषेचा सक्षमपणे वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जनतेशी होणारे सर्व पत्रव्यवहार, संबंधित कार्यालयांच्या सर्व परीक्षा, परिपत्रके, सूचना फलकं मराठीत असणं आता बंधनकारक असेल. केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे सरकारने सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे बँकात आणि सर्व आस्थपनांमध्ये मराठी भाषेसाठी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. दुकानांवरील पाट्या
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. लॉजमालक इतर महिला व ग्राहकांना बोलावून घेत त्यांच्याकडू
data-language="en"> माजलगावात ऊसाचे ट्रॅक्टर अडविले; शुक्रवारी आमदाराच्या घरावर मोर्चा   निलेश चाळक बीड- ऊसाला २६०० रुपये प्रतिटन भाव द्यावा व उत्पादकांची पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी येथे शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. तिन्ही कारखान्यांकडे जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर अडवून पदाधिकाऱ्यानी रोष व्यक्त केला. शिवाय संघर्ष समितीच्या बैठकीत ऊसदरप्रश्नी शुक्रवारी (दि. ८) आ. आर. टी. देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. महिनाभरापासून तालुक्यात ऊसदर व इतर प्रश्नांवर आंदोलन सुरु आहे. शिवसेना, शेकाप व इतर सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन आता शेतकरी संघर्ष समिती गठित केली असून त्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. मंगळवारी विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी एकवटले. अवघ्या अर्ध्या तासाच्या बैठकीत ऊसदरप्रश्नी करावयाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. तालुक्यात माजलगाव सहकरी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना व खासगी तत्वावर जयमहेश कारखाना चालविला जातो. या तिन्ही कारखान्यांना ऊसाचे एक टिपरूही न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
data-language="en"> पशुधन घटण्याची समस्या रायगड जिल्ह्य़ातील पशुधनात मोठी घट होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्य़ात झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण आणि शेतीक्षेत्रात होणारी घट ही यामागची प्रमुख कारणे ठरली आहेत. शासकीय दुग्धव्यवसायही अडचणीत सापडला आहे. रायगड जिल्हा हा एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत हा जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे. वाढत्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचे शेतीक्षेत्र आणि त्याला पूरक व्यवसाय अडचणीत येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्य़ातील शेती क्षेत्रात मोठी घट होत असतानाच आता पशुधनातही मोठी घट होण्यास सुरुवात झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीमुळे समोर आले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून दर सात वर्षांनी पशुगण ना केली जाते. या पशुगणनेत गेल्या सात वर्षांत १ लाख १९ हजार ६६२ने घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १८व्या पशुगणनेत रायगड जिल्ह्य़ात एकूण ४ लाख १२ हजार २९० एवढे पशुधन होते. यात ३ लाख ३२ हजार २३९ गोवंश जनावरांचा तर ८० हजार ५१ एवढय़ा म्हैसवर्गीय जनावरांचा समावेश होता. १९व्या पशु
data-language="en"> बोंडअळीचे संकट; माजलगावात शेतक-याने १० एकर कापूस उपटला  निलेश चाळक   बीड : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील  मुंजाबा जाधव या शेतक-याने १० एकरात मोठ्या आशेने लावलेल्या कापसाचे पीक बोंडअळीला वैतागून उपटून टाकायला सुरुवात केली आहे. मंगळवारी पवारवाडी शिवारात हे चिंता जनक दृष्य पहावयास मिळाले.  यावर्षी तालुक्यात खरीप हंगामात ३७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु; कापसाच्या पहिल्या वेचणीनंतर पिकावर गुलाबी सेंद्रिय बोंडअळीने आक्रमण केले आहे. यामुळे शेतक-याने केलेला खर्चही कापूस उत्पादनातून निघणेही अवघड झाले आहे.  सध्या कापसाला ७० ते ८० बोंडे आहेत. मात्र, कापसावर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे या परिसरातील कापूस उत्पादक  शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी मुंजाबा कडाजीराव जाधव यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वैतागून दहा एकर कापूस उपटून टाकला आहे. आधीच बाजारात कापसाला मिळणारा भाव कमी आहे. त्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीत भर पडली. कृषी विभागाने तात्काळ पिकांची पाहण
data-language="en"> अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे उपोषण   आष्टी : तालुक्यातील मौजे सोलापूरवाडी येथे गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेले असून ते अतिक्रमण हटविण्यात येवून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी सोमवारपासून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव थोरवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. मौजे सोलापुरवाडी येथील गायरान जमिन स.नं.१०  क्षेत्र १०८  एक्कर या जमिनीमध्ये अतिक्रमण होत आहे. वन विभाग व जिल्हाधिकारी यांना अर्ज करून बरेच दिवस झाले तरी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. संबंधित जमिनीवरील लाखो रूपयांचे झाडे चोरून तोडली जात आहेत. लोंढे नामक पोलिस कर्मचार्‍याने ६  एक्कर जमिनीवर अतिक्रमण केले असून ग्रामस्थांचे शेतात जाणारे रस्ते बंद केले आहेत. विचारणा केली असता दमदाटी करण्यात येत असून अ‍ॅट्रासिटी दाखल करू अशी धमकी दिली जात आहे. गावातील दोन पुरूष व एका महिलेवर अ‍ॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोपही थोरवे यांनी निवेदनातुन केला आहे
data-language="en"> तंटामुक्तीसाठी सरसावले पोलीस; बीड ग्रामीण ठाण्यात मेळावा निलेश चाळक  बीड:  महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेसाठी येथील ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. तंटामुक्तीसोबतच दारूबंदीसाठी गावस्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. सोमवारी ग्रामीण ठाण्यात झालेल्या मेळाव्यात यासाठी ६ गावांची निवड करण्यात आली.  उपअधीक्षक सुधीर खिरडकर, सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी यावेळी मार्गदर्शक केले. बीड तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील वाद गावातच मिटावेत, गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी  गावस्तरावर एक समिती तयार करण्यात आली आहे. समितीचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलिस पाटील यांचा समितीत समावेश राहणार आहे.  ग्राम सुरक्षा दला च्या मदतीनें आणि पोलिस यांची मदत घेऊन सुरक्षेसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात  पिंपरगव्हाण, लिंबारुई, कामखेडा, घोडका राजूरी, चऱ्हाटा  यता गावांमध्ये समिती नेमून व्यसनमुक्
data-language="en"> संकटातूनच शिकायचे असते!   सुनील शिवराम काजारे, नालासोपारा   ‘अरे वेडय़ा, तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला. त्या पिकाला तू सभोवतालच्या परिस्थितीशी कधीच संघर्ष करू दिला नाही. उन्हाचा स्पर्श होऊ दिला नाही. सोसाटय़ाच्या वा-यातच पीक उभे राहते. तेव्हाच त्याच्यात बळ येत’’ एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते. कारण, कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पिकांचे मोठे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व सांगितले, ‘‘तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल, इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल, पण माझ्या मते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. मी एक आपल्यापुढे प्रार्थना करतो की, तुम्ही फक्त वर्षभर हा निसर्ग माझ्या ताब्यात द्या, मग बघा मी शेती फुलवून घरोघरी धान्यांच्या राशी कशा घालतो ते!’’ देव हसला आणि म्हणाला, ‘‘तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या
data-language="en"> दृष्टी बदला, शेती परवडेल! शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा निसर्गाचा लहरीपणा.. बी-बियाणे, औषधे, खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती.. बहुतांश वेळा खर्चही भरून निघणार नाही इतपत मिळणारा भाव, या सर्वाची परिणती शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होण्यात होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची ही कथा आहे. शेतीला लाभदायक होण्यासाठ
ओखी चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने मुंबई, ठाण्यासह रायगड परिसरातील काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्‍टीवर जाणवू लागला आहे. मुंबई-  तामिळनाडूसह केरळ किनारपट्टीवर हाहाकार उडवल्यानंतर आता ओखी चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या दिशेने वळले आहे. मुंबई, ठाण्यासह रायगड परिसरातील काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्‍टीवर जाणवू लागला आहे. दरम्यान, ओखी चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. रविवारी कोकणात समुद्र किना-यावर लाटांनी रौद्ररुप धारण केले होते. समुद्राला आलेल्या उधाणात मालवण बंदरात उभी असलेली पोलिसांची ‘सिंधू ५’ ही गस्तीनौका बुडाली. गस्तीनौकेत लाटांचे पाणी घुसल्यामुळे ही नौका बुडाली. ओखी वादळामुळे सोमवारी सायंकाळी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. वेगाने वारे वाहण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवल
data-language="en"> बीडमध्ये खानावळीतही आधार कार्डची सक्ती बीड : शहरासह जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय परिसरात अनधिकृत खानावळी थाटल्या आहेत. या खानावळीत जेवण्यासाठी यायचे असेल तर ओळखीसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. तसेच १८०० रुपये दरमहा आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. नुकतीच या खानावळ चालकांनी संघटना स्थापन केली असून, त्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. यामध्ये मात्र सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. किरायाने खोली करून राहतात. जेवणासाठी खानावळ लावतात. पूर्वी दोन वेळच्या जेवणासाठी १०००-१२०० असा प्रतिमाह दर आकारला जात होता; परंतु नुकतीच या खानावळ चालकांनी संघटना स्थापन केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सचिव अशी कार्यकारिणीही निवडली आहे. ही संघटनाच अनधिकृत असल्याचे धर्मदाय आयुक्त कार्यालयातून समजले आहे. दरम्यान, खानावळ लावायची असेल तर आधार कार्डसह फोटोची सक्ती केली आहे. दोन वेळच्या जेवणासाठी १८०० रुपये, तर एक वेळच्या जेवणासाठी १ हजार रुपये आकारला आहे. काही कारणास्तव सदरील सदस्य जेव
data-language="en"> स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात अकोला :  स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीहून अकोला गाठणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्यात दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केलं. मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर समाधानी नसल्याचं सांगत यशवंत सिन्हांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यशवंत सिन्हा यांनी भाजप सरकारविरोधात आवाज उठवला होता. बोंडअळीग्रस्त कपाशीचं पीक घेऊन यशवंत सिन्हा यांनी आंदोलन केलं. दरम्यान यशवंत सिन्हांच्या आंदोलनादरम्यान भाजप खासदार नाना पटोले आणि आमदार बच्चू कडू यांनी गैरहजेरी लावल्यानं त्याचीही चर्चा सुरु आहे. data-language="en">
data-language="en"> नितीन आगे हत्या प्रकरणातील 13 फितुरांवर कारवाई होणार अहमदनगर : खर्ड्यातील नितीन आगेच्या हत्या प्रकरणी 9 जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील रामदास गवळी यांनी दिली. शिवाय, खटल्यातील 13 फितुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गवळी यांनी सांगितले. “नितीन आगेच्या हत्या प्रकरणी 9 जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून, या प्रकरणी शनिवारी अपिलासाठी औरंगाबाद लॉ अॅण्ड ज्यूडिशियल विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. अहवालानुसार 60 दिवसात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.”, असे सरकारी वकील रामदास गवळी यांनी सांगितले. त्याचबरोबर 13 फितुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, न्यायालयीन कागदपत्रं जमा झाल्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं गवळी यांनी सांगितलं. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते, तर 164 कलमानुसार 8 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र, 13 साक्षीदार फितूर झाले आहेत. शिक्षक बाळू गोरे, रमेश काळ
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्रतिसाद मिळाला न