मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
फाशीची शिक्षा सुनावताच निर्भयाच्या आईने हंबरडा फोडला! "प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते," असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हते. अहमदनगर :  “न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला,” अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने दिली. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली. “मराठी समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी खूप साथ दिली. मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाजांचे, महाराष्ट्राचे मी आभार मानते,” असं निर्भयाची आई म्हणाली. “प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते,” असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हत
‘लग्नासाठी स्थळ शोधताना अपेक्षा मर्यादित ठेवा’ जळगाव - लग्नासाठी स्थळ शोधत असताना अपेक्षा मर्यादित ठेवा जेणेकरून चांगले सगेसोयरे मिळतील, असा सल्ला आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. लेवा नवयुवक संघटनेतर्फे रविवारी (दि. २६) लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत हाेते. स्त्री-पुरुषांच्या जन्मदरातील तफावतीमुळे लग्नासाठी मुली मिळत नाही. यातच मुलींकडून नवरदेव शोधत असताना त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पाल् यांचे वय निघून गेल्यानंतर त्यांचे लग्न होत नाही, असेही खडसेंनी सांगितले. रविवारी (दि. २६) आयोजित करण्यात आलेल्या आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महामेळाव्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर लेवा पाटीदार समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित, शेतकरी, व्यावसायिक विवाहेच्छू युवक युवतींनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवापंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महापौर ललीत कोल्हे, जिल्हा सरकारी वकील
औरंगाबादमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना घरात अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबादच्या आपत भालगावमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं.     औरंगाबाद :   कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना घरात अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबादच्या आपत भालगावमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं. एका जागरूक महिलेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गर्भपात केंद्रावर छापा टाकला. यावेळी वैद्यकीय पदवी नसलेली महिला सर्रास गर्भपात करत असल्याचं पोलिसांच्या चौकशीदरम्यान उघड झालं. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं असून, ललिता खाडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तसंच गर्भपातासाठी तक्रारदार महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या सासू-सासऱ्यांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवप्रताप दिनाचा उत्साह, प्रतापगडावर विविध कार्यक्रम या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सातारा : छत्रपती शिवाजी राजेंच्या शौर्याच्या गाथा सांगणारा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन… या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. एकीकडे गडावरच्या कार्यक्रमाची लगबग सुरु असताना दुसरीकडे मात्र आज सकाळी संपूर्ण प्रतापगड हा धुक्यात हरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. या गडासोबत या भागातील संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा ही धुक्यात हरवल्या होत्या. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातलं, तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगापैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध आहे. त्यानिमित्तच प्रतापगड उत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा केला जातो. ी उपस्थित केलेल्या वादानंतर हा उत्सव आता सरकारच्या वतीने साजरा केला जातो.
'छकुलीचे लचके तोडणाऱ्यांचेही तसेच लचके तोडा' राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई: माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसंच त्या नराधमांचेही लचके तोडा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नगरच्या निर्भयाच्या आईने व्यक्त केली. राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांवर कटकारस्थान क रुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. आता येत्या 22 नोव्हेंबरला आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. निर्भयाच्या कुटुंबियांची मागणी दरम्यान आजच्या सुनावणीनंतर निर्भयाच्या आईने उद्विग्न प्रतिक्रिया दिली. “उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री, मराठी समाज यासह मी सर्वांची आभारी आहे. माझ्या छकुलीला सर्वांनी साथ दिली. आता माझी एव्हढीच अपेक्षा आहे, 22 तारखेला जो न्याय होईल, तो फाशीचाच झाला पाहिजे. माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसंच त्या नराधमांचेही लचके तोडा”, असं निर्भयाच आई म्हणाली. आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या
हिंगणघाटच्या शेतकऱ्याची हायटेक कल्पना, व्हॉट्सअॅपद्वारे सिताफळ विक्री सोशल मीडियाचा वापर इंस्टंट अपडेट्स मिळवण्यासोबतच शेतमाल विक्रीसाठीही करता येतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण याच्या योग्य वापर करुन फळांच्या हायटेक विक्रीतून हिंगणघाटचे रतन बोरकरे लाखोंचा नफा कमावत आहेत . वर्धा : सोशल मीडियाचा वापर इंन्स्टट अपडेट्स मिळवण्यासोबतच शेतमाल विक्रीसाठीही करता येतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण याच्या योग्य वापर करुन फळांच्या हायटेक विक्रीतून हिंगणघाटचे रतन बोरकरे लाखोंचा नफा कमावत आहेत . रतन बोरकर यांची हिंगणघाटमध्ये सात एकर शेती आहे. या सात एकरापैकी प्रत्येकी एक एकरात त्यांनी आंबा, लिंबू आणि सिताफळाची तर उर्वरीत क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. सध्या त्यांना सिताफळांचं उत्पादन चांगलं मिळाली असून, त्यांच्या विक्रीसाठी मार्केट ऐवजी त्यांनी चक्क व्हॉट्सअॅपचा आधार घेतला. आणि त्याचा त्यांना चांगलाच फायदा होत आहे. बोरकरे यांनी एक एकर क्षेत्रात सिताफळाच्या 327 रोपांची त्यांनी लागवड केली होती. यासाठी त्यांनी झिरो बजेट शेती तंत्राचा त्यांनी वापर केला. आठ बाय 13 अशा अंतरावर त्यांनी रोपांची लागवड
69 व्या वर्षी नवव्या लग्नाची तयारी, 28 वर्षीय वधूचा पोबारा 1966 मध्ये रॉन यांचं पहिलं लग्न मार्गारेटशी झालं. तिच्यापासून त्यांना तीन मुलं झाली   लंडन :  ब्रिटनमधील 69 वर्षांचे रॉन शेफर्ड लग्नाच्या तयारीला लागले आहेत. 69 व्या वर्षी बोहल्यावर चढणारी व्यक्ती पाहून अनेकांचे डोळे विस्फारले असतील. पण हे रॉन यांचं पहिलं-दुसरं नाही, तर नववं लग्न ठरलं असतं. ‘असतं!’… कारण त्यांची 28 वर्षीय वधूच पळून गेली आहे. समरसेटमधील योविलमध्ये राहणाऱ्या 69 वर्षीय रॉन शेफर्ड यांची आठ लग्नं झाली आहेत. त्यापैकी एकही यशस्वी ठरु शकलं नाही. नुकतीच रॉन यांची ओळख 28 वर्षाय क्रिस्टल लॅलकशी झाली. दोघांचं प्रेम जुळलं. आपलं उर्वरित आयुष्य क्रिस्टलसोबत व्यतीत करण्याचा निर्धार त्यांनी केला. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या रॉन यांचा फुगा फुटला. लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच ती सामान घेऊन परागंदा झाली. तिचं दुसऱ्याच तरुणावर प्रेम असल्याचा संशय रॉन यांना आहे. त्यामुळे त्यांनी गर्लफ्रेण्डविरोधात पोलिसात धाव घेतली. क्रिस्टलने काहीच दिवसांपूर्वी रॉन यांनी दिलेली अंगठी हरवल्याचा बनाव केला होता. तेव्हाप
  मंत्रालयाच्या गॅलरीतील सज्जावर तरुण उभा, कृषीमंत्र्यांना भेटण्याची मागणी पोलिसांकडून तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सरु आहेत. मात्र तरुणाकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मुंबई : मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या गॅलरीच्या सज्जावर एक तरुण उभा असून, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटण्याची हा तरुण मागणी करत आहे. तरुण मंत्रालय इमारतीच्या सज्जावर उभा असल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या खाली बघ्यांची गर्दी जमली आहे. हा तरुण नेमका कोण आहे, कुठून आला आहे, हे  अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सरु आहेत. मात्र तरुणाकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीच्या  सज्जावर तरुण पोहोचला कसा, हा प्रश्नही उपस्थित होतं
ट्रेनमध्ये महिला प्रवाशांची दादागिरी, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मारहाण नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. विरार : विरार ट्रेन आणि दादागिरी हे जणू समीकरणच बनलं आहे. ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या टोळक्याची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. सीटवर बसण्याच्या कारणावरुन तीन महिला प्रवाशांनी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सपना मिश्रा (वय 19 वर्ष) असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बोईसर इथल्या थीमस इंजिनीअर कॉलेजमध्ये शिकते. नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. बुधवारी सकाळी विरार रेल्वे स्थानकातून 7.55 ची इंटरसिटी एक्स्प्रेस पकडून ती आईसोबत बोईसरला जात होती. परंतु सीटवर बसल्याच्या कारणावरुन तिला तीन महिला प्रवाशांनी मारहाण केली. लिसांनी तिचा जबाब नोंदवला असून चौकशी करुन महिलांविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं
देशभरातील शेतकऱ्यांचं 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते.   नवी दिल्ली :  सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारविरोधात राजधानीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी एकवटण्याचा निर्धार केला आहे. हमीभावासंदर्भात 20 नोव्हेंबरला देशभरातले शेतकरी दिल्लीत धडक देणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीनं हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप दिलं जाणार आहे.
कपाशीची प्रत राखा, भाव अधिक मिळवा! निलेश चाळक बीड - कापसाची प्रत राखण्याकरिता कपाशीची वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. व्यामुळे प्रतवारी करणे आवश्यक ठरते. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकरी सहसा कापूस बाजारात विकायला आणतो. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता कपाशीची वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणत: ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. या वेचण्यामध्ये चांगल्या प्रतिचा कापूस मिळतो. नंतरच्या वेचण्यामध्ये मिळालेला कापूस हलक्या प्रतिचा असतो. आपल्याकडे वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतक-यास त्याने उत्पादित केलेल्या कापसाला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रूईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, का
भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक अधिकार पिकांचे नवीन वाण विकसित करणारे शास्त्रज्ञ यांच्या अधिकारांचे जतन करणे आवश्यक आहे. भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक अधिकार पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. शेतीचा विकास अधिक वेगाने होण्यासाठी तसेच पिकांचे नवीन वाण विकसित करण्यासाठी शेतकरी, तसेच पिकांचे नवीन वाण विकसित कर णारे शास्त्रज्ञ यांच्या अधिकारांचे जतन करणे आवश्यक आहे. या माध्यमातून बी-बियाणे तयार करणारे उद्योजक व त्यांचे उद्योग यांचा विकास होण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासदेखील मदत होईल. पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. भार
परसबागेची चळवळ.. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत.     ममताबाई भांगरे आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे. कळसुबाई शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उतार लक्षा
'मी फसवा लाभार्थी', गंडवून फोटो घेतलेल्या शेतकऱ्याची तक्रार शेतकऱ्यांना न विचारताच 'मी लाभार्थी' या जाहिरातीत त्यांचे फोटो छापल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुंबई :  तीन वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारने केलेल्या जाहिराती वादात सापडल्या आहेत. ‘आपलं सरकार, कामगिरी दमदार’चा नारा देणारं भाजप सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांना न विचारताच ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत त्यांचे फोटो छापल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जाहिरातीत शेतकऱ्यांना ज्या योजनांचा लाभ झाल्याचा दावा केला जात आहेत, त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाल्या आहेत. ‘मी लाभार्थी’, सरकारची जाहिरात पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवरी गावामधल्या शांताराम कटके यांची अवस्था ‘पोश्टर बॉईज’ या सिनेमातील ती नायकांसारखी झाली. नसबंदीच्या जाहिरातीसाठी त्यांचे फोटो कसे वापरले, ह्या गोष्टीची जशी नायकांना कल्पना नसते, तशीच काहीशी स्थिती शांताराम कटके यांची झाली आहे. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत आपला फोटो कसा आल