मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुख्यं सपांदक निलेश चाळक मो,९७६७८७९४६१९ email-nileshchalak7@gmail.com

काळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री

काळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री नागपूर: उद्योजकांना काळजी करण्याचं कारणं नाही कारण 2019 मध्ये लोक मलाच संधी देतील. त्यामुळं उद्योगांना सवलतीत वीज मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९ मध्ये उद्योगांसाठी असलेल्या सवलती संपणार आहेत. या धोरणांमध्ये कमी वीज दरासह अनेक सवलती यात देण्यात आल्या आहेत. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. नविन औद्योगिक धोरणाचा विदर्भ आणि मराठवाड्यावा मोठा फायदा होणार. देशात एकूण जेवढी परकीय गुंतवणूक झाली त्यातली ४७ टक्के महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राचं धोरण उद्योग स्नेही असल्यामुळेच ही गुंतवणूक आकृष्ट झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यक्रमात अनेक उद्योगपतींनी आपल्या भाषणात शंका उपस्थित केली होती. 2019 मध्ये या सवलती संपणार असून त्याच वर्षी निवडणुकाही आहेत. त्यामुळे या सवलती कायम राहणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. उद्योगपती
अलीकडील पोस्ट

दारू दुकान आणि बार मध्ये दर फलक न लावता जादा दराने विक्री

दारू दुकान आणि बार मध्ये दर फलक न लावता जादा दराने विक्री - अधिक्षकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - अँड. अजित देशमुख               बीड ( प्रतिनिधी ) कायद्यातील तरतूद आणि आयुक्तांचे आदेश याला हरताळ फासत जिल्ह्यात देशी दारू आणि बिअर बार चालक ग्राहकांना जादा दराने दारू विकत आहेत. ही बाब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांना माहित आहे. मात्र ते कोणतीही कारवाई करत नाहीत. दारू विक्रेते आणि अधिकारी यांच्यामध्ये काय साटेलोटे आहे, हे सांगता येत नाही. मात्र कायद्याचे उल्लंघन होत असताना अधीक्षक आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. यातून दारूड्यांची संख्या वाढत असून गोर गरीब कुटुंब उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे अधीक्षकांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल, असा इशारा जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.              एकीकडे नवीन दारू दुकान परवाने मागणाऱ्या फाईल हातोहात पळत असताना दुसरीकडे अवैध दारू विक्री बाबत मौन पाळले जात आहे. अवैध आणि जादा दराने होणारी विक्री  सरकारी अधिक
बीडमधील मराठा आरक्षण जनसुनावनीस मराठा बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :-कुंदाताई काळे बीड-:दिर्घकाल टिकणारे मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर मराठा समाजाचं आर्थिक , सामाजिक मागसलेपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या निदर्शनास आणून देणे अत्यावश्यक आहे . याचसाठी राज्य मागासवर्ग आयोग राज्यात सर्वत्र जनसुनावणी आयोजीत केली असून ही सुनावणी 8 तारखेला बीड मध्ये होणार आहे तरी बीड जिल्ह्यातील मराठा बांधवानी मराठा आरक्षण जनसुनावनीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या कुंदाताई काळे यांनी केले आहे . व तसेच अगोदर मराठा समाजात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीचा छापील नमुना तयार केला असून त्यात कौटुंबिक , शैक्षणिक तसेच अन्य माहिती भरावयाची आहे .  सामुहिक आणि  वैयक्तिक स्वरुपात  आयोगाला ही  माहिती सादर करावयाची आहे .  यासाठी तालुक्यातील तसेच प्राधान्यक्रमांच्या गावातील युवक , संघटनांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर माहिती कशी भरावी याबद्दल सखोल माहिती घेणे क्रमप्राप्त आहे , जेणेकरुन तालुका
टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. नाशिक : शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. येवला तालुक्यातील कोटमगावात सुभाष कोटमे यांची तीन एकर शेती आहे. या तीन एकरात ते कांदा, ऊस, टोमॅटो अशी पीकं घेतात. काही वर्षांआधी त्यांना टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर काकडीचं उत्पादन घेणारी शेतं पाहिली. तेव्हा आपल्याही शेतात हा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे गेली आठ ते 10 वर्ष ते काकडीचं उत्पादन घेतात. यंदा तीन महिन्याआधी त्यांनी तीन एकरात काकडीची लागवड केली. आणि ही लागवड त्यांना लाखोंचा नफा देणारी ठरली.
data-language="en"> बीडमधील 'न्यूटन', चप्पूवरुन नदी पार करत मतदारांची नोंदणी बीड  :  निवडणूक आयोगाच्या कामाला आम्हाला जुंपलं जातं, अशी ओरड शिक्षकांकडून होत असते. अनेकदा तर हे काम टाळतानाही शिक्षक आढळून येतात. अशी स्थिती एकीकडे असताना बीडमधील एका शिक्षकाने वेगळा पायंडा पाडला आहे. नुसता पायंडाच नव्हे, तर एक आदर्श निर्माण केला आहे. ‘न्यूटन’ सिनेमात अभिनेता राजकुमार राव हा नक्षलवादी भागात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जीव धोक्यात टाकतो. तसेच काहीसे बीडमधील संदीप पुरी या शिक्षकाने जीव धोक्यात टाकून  निवडणूक प्रक्रियेत लोकसहभागासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक म्हणजे लोकशाही भक्कम करण्याचं माध्यम. याच निवडणुकीची सर्व कामं पाहणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वतोपरी मदत सरकारी शाळांमधील शिक्षक करत असतात. मतदार याद्यांपासून ते मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणापर्यंत, बहुतेक कामांमध्ये शिक्षक मदत करतात. मात्र अनेक ठिकाणी काही शिक्षक या कामांना नकार देतात, हे आमचं काम नसल्याचेही सांगतात. बीडमधील एक शिक्षक मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत, एक प्रेरणादायी
nilesh chalak beed nilesh chalak beed data-language="en"> बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा बीड : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. ८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे. १ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">