मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पावसाने जिरेवाडी परिसरातील शेतकरी सुखावले बीड: मागील दीड महिन्यापासून दंडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून सुरूवात केल्याने जिरेवाडी परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्हयात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रविवारी सकाळ पर्यंत ७५३.१४ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. (चोवीस तासात) सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे. दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. शनिवारी सायंकाळ पासून सुरू झालेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पाऊस मागील चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे म्हणजे ६५ मि. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बीड- ७४.८२, पाटोदा ९७.५०, गेवराई ६९.२०, शिरूर कासार ८२.००, अंबाजोगाई ७५.००, केज ६५.८६ अशी नोंद आहे. याशिवाय आष्टी, ६२.८६, वडवणी ५९.००, माजलगाव ५१.५०, धारूर ५७.००, परळी ५८.४० अशी मागील चोवीस तासातील पावसाची नोंद आहे. एकूण सरासरी ६८.५० मि.मी. पावसाची नोंद झालेल