बीडमधील मराठा आरक्षण जनसुनावनीस मराठा बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :-कुंदाताई काळे बीड-:दिर्घकाल टिकणारे मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर मराठा समाजाचं आर्थिक , सामाजिक मागसलेपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या निदर्शनास आणून देणे अत्यावश्यक आहे . याचसाठी राज्य मागासवर्ग आयोग राज्यात सर्वत्र जनसुनावणी आयोजीत केली असून ही सुनावणी 8 तारखेला बीड मध्ये होणार आहे तरी बीड जिल्ह्यातील मराठा बांधवानी मराठा आरक्षण जनसुनावनीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या कुंदाताई काळे यांनी केले आहे . व तसेच अगोदर मराठा समाजात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीचा छापील नमुना तयार केला असून त्यात कौटुंबिक , शैक्षणिक तसेच अन्य माहिती भरावयाची आहे . सामुहिक आणि वैयक्तिक स्वरुपात आयोगाला ही माहिती सादर करावयाची आहे . यासाठी तालुक्यातील तसेच प्राधान्यक्रमांच्या गावातील युवक , संघटनांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर माहिती कशी भरावी याबद्दल सखोल माहिती घेणे क्रमप्राप्...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619