मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २८, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
फाशीची शिक्षा सुनावताच निर्भयाच्या आईने हंबरडा फोडला! "प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते," असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हते. अहमदनगर :  “न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला,” अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने दिली. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली. “मराठी समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी खूप साथ दिली. मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाजांचे, महाराष्ट्राचे मी आभार मानते,” असं निर्भयाची आई म्हणाली. “प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते,” असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हत