कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे. बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619