31 जानेवारीला मराठा बांधव करणार चक्का जाम आंदोलन ! पत्रकार परिषदः गड किल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी बीड,दि.28(प्रतिनिधी)ः- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कोपर्डी घटनेच्या प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात चालवावा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होता कामा नये.गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी. यासह आदी मागण्या घेवून मराठा बांधव 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाचा एक भाग म्हणून संबध राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतर 6 मार्चला विधीमंडळ अधिवेशनावर मुक मोर्चा काढला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या पदाधिकार्यांनी दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा म...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619