31 जानेवारीला मराठा बांधव करणार चक्का जाम आंदोलन !
मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या
अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा मोरे, रेश्मा पाटील, रामेश्वर शिंदे, कृषिराज टकले, कृष्णा देशमुख, भरत वालेकर यांच्यासह आदी मराठा संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना मराठा संघटनांचे पदाधिकारी म्हणाले की, मराठा समाज बांधवाने राज्यातच नव्हेत देशभर अतियश ऐतिहासह मराठा क्रांती मुक मोर्चे काढलेले आहेत.या लाखोंच्या मोर्चामध्ये सरकारच्या मालमत्तेचे कुठेच मराठा बांधवांकडून नुकसान झालेले नाही. याच मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर 31 जानेवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात मराठा समाज बांधव चक्का जाम आंदोलन करणार आहे. हे आंदोलन सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत केले जाईल. या चक्का जाम आंदोलनामध्ये सरकारच्या मालमत्तेचे कुठल्याही प्रकारचे नुकसान केले जाणार नाही. त्याचबरोबर या आंदोलन काळात रुग्ण, रुग्णवाहिका, अग्नीशमन गाडी, विद्यार्थी यांना या चक्का जाम आंदोलनापासून कुठलीही इजा पोहचणार नाही याची काळजी मोर्चाच्या संयोजन समितीकडून घेण्यात आलेली आहे. हा चक्का जाम मोर्चा पार पडल्यानंतर येत्या 6 मार्चला राज्यातील जवळपास दोन कोटींच्यावर मराठा बांधव आपल्या मागण्या घेवून मुंबई विधानभवनावर धडकणार आहेत. मुंबई येथील आंदोलनाच्या काळात राज्याच्या काना-कोपर्यातून येणारी वाहने कुठल्याही प्रकारचा टोलनाका देणार नाहीत. अशी भुमिकाही यावेळी संघटनांच्या प्रतिनिधीनी स्पष्ट केली. संभाजी सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राज्याभरातील मराठा संघटनाचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
चक्का जाम मोर्चात सहभागी न
होणार्या आमदारांना धडा शिकवा
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 146 आमदारांनी आता ठोस निर्णायक पावले उचलली पाहिजेत. 31 जानेवारी रोजी होणार्या चक्का जाम आंदोलनात जर का लोकप्रतिनिधी सहभागी नाही झाले तर त्यांना मराठा समाज बांधवांनी येत्या निवडणूकात त्यांची जागा दाखवून द्यावी असे सडेतोड बोल पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या प्रतिनिधीनी लगावले.
पत्रकार परिषदः गड किल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी
बीड,दि.28(प्रतिनिधी)ः- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कोपर्डी घटनेच्या प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात चालवावा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होता कामा नये.गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी. यासह आदी मागण्या घेवून मराठा बांधव 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाचा एक भाग म्हणून संबध राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतर 6 मार्चला विधीमंडळ अधिवेशनावर मुक मोर्चा काढला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या पदाधिकार्यांनी दिली.मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या
अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा मोरे, रेश्मा पाटील, रामेश्वर शिंदे, कृषिराज टकले, कृष्णा देशमुख, भरत वालेकर यांच्यासह आदी मराठा संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना मराठा संघटनांचे पदाधिकारी म्हणाले की, मराठा समाज बांधवाने राज्यातच नव्हेत देशभर अतियश ऐतिहासह मराठा क्रांती मुक मोर्चे काढलेले आहेत.या लाखोंच्या मोर्चामध्ये सरकारच्या मालमत्तेचे कुठेच मराठा बांधवांकडून नुकसान झालेले नाही. याच मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर 31 जानेवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात मराठा समाज बांधव चक्का जाम आंदोलन करणार आहे. हे आंदोलन सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत केले जाईल. या चक्का जाम आंदोलनामध्ये सरकारच्या मालमत्तेचे कुठल्याही प्रकारचे नुकसान केले जाणार नाही. त्याचबरोबर या आंदोलन काळात रुग्ण, रुग्णवाहिका, अग्नीशमन गाडी, विद्यार्थी यांना या चक्का जाम आंदोलनापासून कुठलीही इजा पोहचणार नाही याची काळजी मोर्चाच्या संयोजन समितीकडून घेण्यात आलेली आहे. हा चक्का जाम मोर्चा पार पडल्यानंतर येत्या 6 मार्चला राज्यातील जवळपास दोन कोटींच्यावर मराठा बांधव आपल्या मागण्या घेवून मुंबई विधानभवनावर धडकणार आहेत. मुंबई येथील आंदोलनाच्या काळात राज्याच्या काना-कोपर्यातून येणारी वाहने कुठल्याही प्रकारचा टोलनाका देणार नाहीत. अशी भुमिकाही यावेळी संघटनांच्या प्रतिनिधीनी स्पष्ट केली. संभाजी सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राज्याभरातील मराठा संघटनाचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
चक्का जाम मोर्चात सहभागी न
होणार्या आमदारांना धडा शिकवा
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 146 आमदारांनी आता ठोस निर्णायक पावले उचलली पाहिजेत. 31 जानेवारी रोजी होणार्या चक्का जाम आंदोलनात जर का लोकप्रतिनिधी सहभागी नाही झाले तर त्यांना मराठा समाज बांधवांनी येत्या निवडणूकात त्यांची जागा दाखवून द्यावी असे सडेतोड बोल पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या प्रतिनिधीनी लगावले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा