स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन काळाच्या पडद्याआड
निलेश चाळक बीड- स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागात २० ते २५ वर्षापुर्वी घराघरात दिसणारे जुन्या पद्धतीचे काळे दूरध्वनी आता दिसतच नाहीत. त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाईल मुळे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन मात्र काळाच्या पडद्याआड जात असल्याचे दिसून येत आहे आत्ता ग्रामीण भागात जो तो मोबाइल वापरत आहेयाबाबत अधिक माहीती अशी कि २० ते २५ वर्षापुर्वी ग्रामीण भागात अख्ख्या गावात एकाच घरी फोन असायचा. त्यावरही क्वचितच फोन यायचा. सहज कुणीच कुणाला फोन करायचं नाही. अगदी महत्त्वाचं काम असेल तरच फोन व्हायचा. आणि तेही कामाचं बोलून झाल्यावर फोन लगेच बंद केला जायचा. तरीही कुणाचं काहीच अडायचं नाही. उलट जर अपरात्री फोन वाजला की भीतीच वाटायची. वस्तीत ज्यांच्या घरी फोन असायचा ते चांगलेच शेखी मिरवायचे. आपल्याला फोन वापरायला मिळावा म्हणून इतर शेजारीही अशांना लग्गा लावायचे परंतू आत्ता ग्रामीण भागात अशी परिस्थिती नाही प्रत्येकाच्या घरी सगळ्या जवळ स्मार्ट फोन ,मोबाईल आहेत त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाईल मुळे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन मात्र काळाच्या पडद्याआड जात असल्याचे दिसून येत आहे आणि जर आपण आज पाहील तर ग्रामीण भागात प्रत्येकाच्या हातात त्यांचा अविभाज्य भाग म्हणजेच स्मार्ट फोन असतो. गावातल्या एखाद्या पारावर बसलेले नागरीक तरूण दिसतात आणि प्रत्येकजण दर मिनिटाला आपापल्या फोनकडे पाहत असतो. जरी त्या पारावर काही बोलण्याचा विषय सुरू झाला तरी मधेच कुणाचा तरी फोन वाजतो आणि मग ती व्यक्ती आपण भेटण्यासाठी एकत्र आलो आहोत हे भान विसरून बिनधास्त आरामात फोनवर बोलत राहते. तोपर्यंत इतर सर्वजण व्हॉट्सअॅपमधे डोकी घालून गर्कझालेले ग्रामीण दिसून येतात आणि गावातील एक लॅण्डलाइन जमाना जाऊन सगळ्यांकडे फोन आले. अगदी ज्याच्या त्याच्या घरी फोन. फोनचं सर्वांना केवढं अप्रूप होतं तेव्हा! फोनचे दर थोडे स्वस्त होऊ लागले, मग लोकांना चांगलीच फोनवर बोलायची सवय लागली! आता मोबाइल जमाना आल्यावर तर विचारायलाच नको! पत्रं, काळा फोन, तारा यांचा पूर्ण नक्षाच बदलला! तार यंत्रणा तर पूर्ण बंद झाली! दूरध्वनीचा काळ होता, तेव्हा सगळ्यांना ओळखीच्यांचे फोन नंबर पाठ असायचे! आता मोबाइलमुळे अनेकांना जवळच्यांचेसुद्धा नंबर पाठ नसतात. पण तरीदेखील अनेक घरांमध्ये अजूनही लॅण्डलाइन ठेवतात. आणि अनेक माणसं, विशेषत: आधीच्या पिढीतली, अजूनही लॅण्डलाइनवरूनच फोन करणं पसंत करतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा