ट्रेनमध्ये महिला प्रवाशांची दादागिरी, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मारहाण
नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते.
विरार : विरार ट्रेन आणि दादागिरी हे जणू समीकरणच बनलं आहे. ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या टोळक्याची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
सीटवर बसण्याच्या कारणावरुन तीन महिला प्रवाशांनी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सपना मिश्रा (वय 19 वर्ष) असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बोईसर इथल्या थीमस इंजिनीअर कॉलेजमध्ये शिकते.
नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. बुधवारी सकाळी विरार रेल्वे स्थानकातून 7.55 ची इंटरसिटी एक्स्प्रेस पकडून ती आईसोबत बोईसरला जात होती. परंतु सीटवर बसल्याच्या कारणावरुन तिला तीन महिला प्रवाशांनी मारहाण केली.
लिसांनी तिचा जबाब नोंदवला असून चौकशी करुन महिलांविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा