शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग.
नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे.
नाशिक : शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे.
येवला तालुक्यातील कोटमगावात सुभाष कोटमे यांची तीन एकर शेती आहे. या तीन एकरात ते कांदा, ऊस, टोमॅटो अशी पीकं घेतात. काही वर्षांआधी त्यांना टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर काकडीचं उत्पादन घेणारी शेतं पाहिली. तेव्हा आपल्याही शेतात हा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं.
त्याप्रमाणे गेली आठ ते 10 वर्ष ते काकडीचं उत्पादन घेतात. यंदा तीन महिन्याआधी त्यांनी तीन एकरात काकडीची लागवड केली. आणि ही लागवड त्यांना लाखोंचा नफा देणारी ठरली.
सुभाष कोटमे यांनी टोमॅटोसाठीचं स्ट्रक्चर आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था तशीच ठेवली आणि जमीन नांगरुन घेतली. लागवडीसाठी जिप्सी जातीच्या काकडीची निवड केली. एक एकरासाठी त्यांना जवळपास 11 ते 12 बियाण्यांची पाकिटं लागली. शेतातील विहीर आणि शेततळ्यांतून ठिबकाद्वारे पाणी दिलं. चाळीस दिवसांत काकडी काढणीसाठी तयार झाली.
data-language="en">
कोटमेंना काकडीच्या लागवडीसाठी एकूण 50 हजारांचा खर्च आला. या तीन महिन्याच्या काकडीतून आतापर्यंत सातशे क्रेट उत्पादन मिळालं. यात सरासरी 200 प्रति क्रेटचा दर त्यांना मिळाला. आतापर्यंत यातून त्यांना 1 लाख 40 हजार मिळाले आहेत. यातून खर्च वजा जाता कोटमे यांना 90 हजार रुपये मिळाले. पुढे आणखी 400 ते 500 क्रेट उत्पादन निघणार आहे. दर असाच स्थिर राहीला, तर यातून दोन लाखांपर्यंतचा नफा मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
नफा मिळवता येतो. आणि हेच सुभाष कोटमे यांच्या यशोगाथेतून सिद्ध होतं.
data-language="en">
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा