मुख्य सामग्रीवर वगळा
*शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे?*


दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात.
महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.
१७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट भारतभर करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.
जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात.
पाऊसमान चांगले असल्यास इंद्रायणी भात करावा. घरी खाण्यासाठी नवीन एच. एम. टी. प्रिमियम वाण करावा.
ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस औषधे व  सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.
सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.
द्राक्षाची एप्रिल, ऑक्टोबर छाटणी लवकर घेऊन रमजान व नाताळाला द्राक्ष आखाती राष्ट्र व युरोप राष्ट्रात निर्यात करता येतात. तसेच महिनाभर अगोदर द्राक्ष काढल्यामुळे पाणी, मजुरी, खत, औषधे यांच्यात बचत होते.
रमजान, नाताळ व इतर सणांसाठी कलिंगड व खरबुजाची लागवड  आंतरपीक (डाळींबात किंवा शेवग्यात) घेतले तर रमजान किंवा नाताळाला देशांतर्गत मार्केटमध्ये निर्यातीस उपलब्ध होतात. हा अनुभव भारतभर शेतकऱ्यांनी घेतला आहे.
गणपती झाल्यानंतर पितृ पंधरावड्यामध्ये विविध प्रकारची भाजी यावी. यासाठी नियोजन करून उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना अल्पावधीत कमी लागवडीत पैसे मिलवता येतात.
सप्टेंबर, ऑक्टोब (भाद्रपद) महिन्यात थंडी सुरू होण्यापूर्वी भेंडी वितभर आपल्या तंत्रज्ञानाने उगवून ऐन थंडीत भेंडीचे हमखास पैसे होतात.
नवरात्रीच्या अगोदर बाजरी, हळवा कांदा अथवा उडीद काढल्यावर गहू करताना गव्हाची लागवड जर्मिनेटर लावून १९ नोव्हेंबरच्या आत करावी व गव्हास लागवडीपासून दर २१ दिवसांनी (२१,४२,६३,८४,१०५,१२६) जसे पाणी उपलब्ध असेल तशा पाळ्या द्याव्यात, परंतु पाळ्या कधीही चुकवू नयेत.
४२ व्या दिवशीचे पाणी उपलब्ध नसल्यास ६३ व्या दिवशी द्यावे. ६३ व्या दिवशी नसेल तेव्हा ८४ व्या दिवशी द्यावे आणि १०५ व्या दिवशी हमखास पाणी द्यावे, म्हणजे गव्हात चिक भरतेवेळी हमखास पाणी द्यावे आणि सुरूवातीपासून  ३ फवारण्या घ्याव्यात व  सेंद्रिय खत द्यावे.
पाण्याची कमतरता असल्यास डाळींबाचा मृग बहार धरावा आणि ह्या बहाराची फळे द्राक्ष व आंबा मार्केटला येण्यापूर्वी (१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी) आणावीत.
द्राक्ष शक्यतो लवकर सुरू करून नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये मार्केटला आणून १ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत संपवून टाकावीत. कुठल्याही परीस्थितीत द्राक्ष, डाळींब हे आंब्याच्या काळात येणार नाही. हे पाहावे.
स्ट्रॉबेरी देशभर या विज्ञानाने कोठेही येऊ शकते, ती नाताळाला मार्केटमध्ये येईल, हे पहावे. म्हणजे १०० ते २५० रू. चा भाव मिळेल. तसेच ती फेब्रुवारीपर्यंत चालावी व एप्रिलमध्ये कमी होऊन मे मध्ये जास्त यावी, हे पहावे. म्हणजे मे चे भाव सापडतात.
सिताफळ गौरी गणपतीत यावीत यासाठी मार्गशिर्षात सिताफळास खांदणी करून फवारण्या करून कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे व पाणी सोडावे. म्हणजे उन्हाळ्यात फुलगळ होत नाही. पावसाळ्यात सिताफळे काळी पडत नाहीत, डोळे मोठे होतात व दसरा - दिवाळीच्या मंदीत फळे सापडत नाहीत.
अंजीराचा बहार खट्टा असो वा मिठ्ठा, तो हमखास चांगला येतो. (संदर्भ: कृषी विज्ञान डिसेंबर ९९, पान नं. २१) खट्ट्याबहाराच्या फळांनासुध्दा गोडी येऊन बहार चांगला येऊन हमखास पैसे होतात. मिठ्ठा बहाराची फळे फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळून चांगला ८० ते १२० रू. किलोचा भाव सापडून शेतकऱ्यांना पैसे मिळतात. शिवाय पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे बाग न तुटता पाणी, खत व मेहनतीमध्ये बचत होते.
हळवी कांदा किंवा रांगडा कांदा मार्केटला लवकर आणला तर त्याला डबल पत्ती येऊन भाव सापडतात. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरला फुरसुंगी हा गेल्यावर्षीचा साठवणीतला कांदा मार्केटला आणला तर दक्षिण भरतातील आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यातील मोठ्या शहरात म्हणजेचे बेंगलोर, चेन्नई, तिरूअनंतपुरम, कोईमत्तूर अशा शहरात कांद्याचे भाव चढे (वाढते) राहून हमखास पैसे होतात.
आंबा (हापूस) औषधे व सेंद्रिय खत वापरून मार्चच्या अगोदर मार्केटला आणला तर पैसे तर होतातच, परंतु मे महिन्यात अति उष्णतेने जो साका होतो तो हमखास टाळता येतो.
श्रावण व वैशाखमध्ये कमी पाण्यावर मूग करावा. म्हणजे भाद्रपद महिन्यात व उन्हाळ्यामध्ये हे पैसे वापरता येतात.
संत्र्याला बाराही महिने मार्केटला भाव असतो. कमी पाण्याच्या उपलब्धतेत संत्र्याच्या बागा जळत आहेत, कोळशी रोगाने जात आहेत, डायबॅकने खलास होत आहेत. दिंक्याने कोसळत आहे
मिरचीची लागवड अशी करावी की. उन्हाळ्यात (मार्च ते मे) मार्केटमध्ये येईल. या पध्दतीने या तंत्रज्ञानाने करावी. म्हणजे या काळात पैसे होतात. हा देशभरातील शेतकऱ्यांना अनुभव आहे.
हलक्या, मुरमाड, वरकस, पडीक, मध्यम क्षार असलेल्या जमिनीमध्ये कमी पाण्याच्या उपलब्धतेवर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड करावी.
केळीची लागवड मृगातली असो अथवा कांदे बागातली असो, ती एरवी १५ ते १८ महिन्यात येते. टिश्यु कल्चरने १२ महिण्यात त्यामुळे मेहनत, मशागत, पाणी, खते, मजुरी यामध्ये प्रचंड बचत होऊन केळी लवकर म्हणजे पारंपारिकतेपेक्षा ४ महिने अगोदर, महणजे एप्रिल- मे ते जुलै - ऑगस्ट (चातुर्मासात) आल्याने शेतकऱ्याला त्याच्या मालाचे निशिच्त मनासारखे पैसे मिळतात.
संकरित पपई पुढच्या रमजानला मिळावी, म्हणून या वर्षाचा रमजान झाल्याबरोबर लावावी. म्हणजे ८ व्या महिन्यात पपई सुरू होऊन पुढच्या वर्षी ऐन रमजामध्ये पैसे होतात. दसरा - दिवाळीला पपई मार्केटला येईल अशी कधीच लागवड करू नये. तसे चुकून झाल्यास त्यातून सुटका होण्यासाठी क्रॉंपशाईनरची फवारणी करून, एक महिना पपई आहे त्याच अवस्थेत ठेवता येते. मात्र ये काळात राईपनरचा वापर करू नये. म्हणजे पपई अशीरा मिळून दसरा - दिवाळीतील मंदीच्या लाटेत सापडणार नाही.
टोमॅटोची लागवड मार्च, जून आणि डिसेंबरमध्ये पहिल्या पंधरावड्यात करावी, म्हणजे भाव सापडतात.
काटेरी, भरताची व अंगोरा वांग्याला सर्वसाधारण बाराही महिने भाव असतो. परंतु पावसाळ्यामध्ये शेंडे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवड करू नये. दुष्काळी भागात पावसाळ्यात लागवड केली तरी चालते. हीच वांगी  पुढे वर्षभर चालवता येतात. पावसाचे प्रमाण २५ ते ५० इंच आहे तेहते वांगी दसर्‍यानंतर करावीत वांग्याला सरासरी १५ ते २० रू. किलो भाव सापडतो.
कोबीचे फेब्रुवारी ते उन्हाळ्यात चांगले पैसे होतात. त्यासाठी दोन महिने अगोदर रोपे लावून लागवड करावी. कोबीचा गड्डा नारळी आकाराचा, हिरवागार, लांबट, गोल एका चौकोनी कुटुंबास पुरेसा होता. हा गड्डा वजनदार असतो, त्यामुळे एका गड्ड्याच्या दोन वेळेस भाज्या व कोशिंबीर होते. कोबी फेब्रुवारीत काढण्यासाठी दिवाळीत लागवड करावी.
फ्लॉवरला ऑगस्ट, फेब्रुवारी आणि उन्हाळ्यामध्ये मागणी असते. फ्लॉवरचा गड्डा पांढराशुभ्र घट्ट आणि आकार आंब्याच्या झाडाच्या चित्रासारखा गोलसर असावा. वजन ३५० ते ६०० ग्रॅम असावे. अशा गड्ड्यांना भाव जादा मिळतो.
मार्केटला मंदीची लाट - जूनला अॅडमिशन असतात, त्यामुळे मंदीचा लाट असते. नंतर गणपती ते दिवाळी ही लाट ओसरते, कारण त्यावेळेस लोकांचे बोनस व आलेल्या शेतीमालाचे पैसे मार्केटमध्ये राहतात. दिवाळीनंतर परत मंदीची लाट डिसेंरमध्ये येते ती टॅक्स भरणे, बँकेचे हप्ते भरणे अशा विविध व्यवहारी बाबींमुळे मे पर्यंत टिकून राहते व त्यामुळे मार्केटमध्ये पैशाची उलाढाल कमी होते.
आठमाही बागायती पाणी साधारण जानेवारी - फेब्रुवारीमध्ये संपते. या काळात भाजीपाला व फळपिकांमध्ये प्रत्यक्षामध्ये तेजी असावयास हवी, तथापि नाही म्हटले तरी मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे व असा भाजीपाला पारंपारिक पध्दतीने केल्याने व सर्व साधारण माणसाची क्रयशक्ती कमी असल्याने पैसे होते नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
यावर मात करण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, फळे अन्नधान्ये जर निर्माण केले तर ती देशांतर्गत शहरी व निमशहरी मार्केटमध्ये यासाठी प्रचंड वाव आहे. कारण पारंपारिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालापेक्षा सेंद्रिय शेती मालास देशात चौपट तर प्रदेशात ४ ते १० पट भाव मिळू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स...
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा...
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य...
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्र...
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली...
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. ल...
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर...
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे...