मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे...
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर...
रस्त्यावर नोटांचा ढीग लुटण्यासाठी लोकांची उडली झुंबड, पण पुढे जे घडलं... बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होत्या. मग का ?,   21 आॅगस्ट :   रस्त्यावर जर तुम्हाला सुट्टे नाणे जर सापडले तर ते घेण्याचा मोह आवरणार नाही...त्याच जागी जर नव्या 2000 आणि 500 नोटांचा ढीग रस्त्यावर आढळला तर ?, साहजिकच एक-दोन नोटा तर सहज खिश्यात घालणार...पण असाच मोह केल्यामुळे औरंगाबादकरांची चांगलीच फजिती झालीये. घडलेली हकीकत अशी की, औरंगाबाद चिकलठाणा एमआयडीसी वसहतीमध्ये भररस्त्यावर नोटांचा ढिग पाहण्यास मिळाला. बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होता. मग का ?, हा हा म्हणता बातमी वाऱ्या सारखी पसरली. नोटांचा ढीग पाहण्यासाठी आणि नोटा लुटण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. चक्क 2 हजार आणि 500 शेच्या नोटा बघून अनेकांना मोह आवरला नाही. मग काय लोकांनी भरभरा नोटा घेण्यास सुरुवात ही केली. मात्र लोकांचा अचानक हिरमोड झाली. कारण त्या नोटा नकली होत्या. नकली म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यासाठी ज्या नोटा वापरतात ना त्या...
मराठमोळ्या संजीवनी जाधवला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक वीस वर्षांच्या संजीवनी जाधवचं हे दुसरं मोठं यश ठरलं आहे. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे नाशिक :   नाशिकच्या संजीवनी जाधवनं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तैपेई सिटीत आयोजित या स्पर्धेत संजीवनीनं दहा हजार मीटर्स शर्यतीचं रौप्यपदक जिंकलं. नाशिकच्या संजीवनी जाधव या मराठमोळ्या धावपटूनं दोन महिन्यांमध्ये दोन पदकं मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. वीस वर्षांच्या संजीवनीचं हे दुसरं मोठं यश ठरलं. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे. संजीवनी ही मूळची पैलवान आहे. पण नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी तिला अॅथलेटिक्सकडे वळवलं आणि तिच्या आयुष्याला कला...
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
बीडमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्याची हत्या भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडला.  बीड :   बीडमधील गेवराईत बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरांनी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली, तर दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करुन लाखोंचा ऐवज लंपास केला. गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत ही घटना घडली. भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडला. पहाटे साडे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. घाडगे यांच्या पत्नी अलका (वय 42 वर्ष) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदिनाथ घाडगे, घरात बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (वय 22 वर्ष) आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे (वय 18 वर्ष) यांच्यावरही हल्ला केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घाडगे दाम्पत्याचा ...
पावसाने जिरेवाडी परिसरातील शेतकरी सुखावले बीड: मागील दीड महिन्यापासून दंडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून सुरूवात केल्याने जिरेवाडी परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्हयात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रविवारी सकाळ पर्यंत ७५३.१४ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. (चोवीस तासात) सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे. दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. शनिवारी सायंकाळ पासून सुरू झालेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पाऊस मागील चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे म्हणजे ६५ मि. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बीड- ७४.८२, पाटोदा ९७.५०, गेवराई ६९.२०, शिरूर कासार ८२.००, अंबाजोगाई ७५.००, केज ६५.८६ अशी नोंद आहे. याशिवाय आष्टी, ६२.८६, वडवणी ५९.००, माजलगाव ५१.५०, धारूर ५७.००, परळी ५८.४० अशी मागील चोवीस तासातील पावसाची नोंद आहे. एकूण सरासरी ६८.५० मि.मी. पावसाची नोंद झालेल...