मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बीडमधील मराठा आरक्षण जनसुनावनीस मराठा बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :-कुंदाताई काळे बीड-:दिर्घकाल टिकणारे मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर मराठा समाजाचं आर्थिक , सामाजिक मागसलेपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या निदर्शनास आणून देणे अत्यावश्यक आहे . याचसाठी राज्य मागासवर्ग आयोग राज्यात सर्वत्र जनसुनावणी आयोजीत केली असून ही सुनावणी 8 तारखेला बीड मध्ये होणार आहे तरी बीड जिल्ह्यातील मराठा बांधवानी मराठा आरक्षण जनसुनावनीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या कुंदाताई काळे यांनी केले आहे . व तसेच अगोदर मराठा समाजात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीचा छापील नमुना तयार केला असून त्यात कौटुंबिक , शैक्षणिक तसेच अन्य माहिती भरावयाची आहे .  सामुहिक आणि  वैयक्तिक स्वरुपात  आयोगाला ही  माहिती सादर करावयाची आहे .  यासाठी तालुक्यातील तसेच प्राधान्यक्रमांच्या गावातील युवक , संघटनांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर माहिती कशी भरावी याबद्दल सखोल माहिती घेणे क्रमप्राप्...
टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. नाशिक : शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला; आणि तीन एकरात काकडीच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. येवला तालुक्यातील कोटमगावात सुभाष कोटमे यांची तीन एकर शेती आहे. या तीन एकरात ते कांदा, ऊस, टोमॅटो अशी पीकं घेतात. काही वर्षांआधी त्यांना टोमॅटोच्या स्ट्रक्चरवर काकडीचं उत्पादन घेणारी शेतं पाहिली. तेव्हा आपल्याही शेतात हा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे गेली आठ ते 10 वर्ष ते काकडीचं उत्पादन घेतात. यंदा तीन महिन्याआधी त्यांनी तीन एकरात काकडीची लागवड केली. आणि ही लागवड त्यांना लाखोंचा नफा देणारी ठरली....
data-language="en"> बीडमधील 'न्यूटन', चप्पूवरुन नदी पार करत मतदारांची नोंदणी बीड  :  निवडणूक आयोगाच्या कामाला आम्हाला जुंपलं जातं, अशी ओरड शिक्षकांकडून होत असते. अनेकदा तर हे काम टाळतानाही शिक्षक आढळून येतात. अशी स्थिती एकीकडे असताना बीडमधील एका शिक्षकाने वेगळा पायंडा पाडला आहे. नुसता पायंडाच नव्हे, तर एक आदर्श निर्माण केला आहे. ‘न्यूटन’ सिनेमात अभिनेता राजकुमार राव हा नक्षलवादी भागात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जीव धोक्यात टाकतो. तसेच काहीसे बीडमधील संदीप पुरी या शिक्षकाने जीव धोक्यात टाकून  निवडणूक प्रक्रियेत लोकसहभागासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक म्हणजे लोकशाही भक्कम करण्याचं माध्यम. याच निवडणुकीची सर्व कामं पाहणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वतोपरी मदत सरकारी शाळांमधील शिक्षक करत असतात. मतदार याद्यांपासून ते मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणापर्यंत, बहुतेक कामांमध्ये शिक्षक मदत करतात. मात्र अनेक ठिकाणी काही शिक्षक या कामांना नकार देतात, हे आमचं काम नसल्याचेही सांगतात. बीडमधील एक शिक्षक मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत, एक प्रेरणादायी...
nilesh chalak beed nilesh chalak beed data-language="en"> बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा बीड : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. ८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे. १ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्...
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
data-language="en"> राज्यात सर्व ठिकाणी मराठी अनिवार्य, शासन निर्णय जारी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई :  केंद्र शासनाची कार्यालये, बँका, टपाल, दूरध्वनी कंपन्या, विमा कंपन्या, कर विभाग, रेल्वे, मेट्रो – मोनो, विमानसेवा, गॅस, पेट्रोलियम या ठिकाणी मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी आणि हिंदीनुसार मराठी भाषेचा सक्षमपणे वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जनतेशी होणारे सर्व पत्रव्यवहार, संबंधित कार्यालयांच्या सर्व परीक्षा, परिपत्रके, सूचना फलकं मराठीत असणं आता बंधनकारक असेल. केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे सरकारने सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे बँकात आणि सर्व आस्थपनांमध्ये मराठी भाषेसाठी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. दुकानांवरील पाट्या...
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. ल...