मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?
निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com
कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे
त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली गावाची आहे आणि ततिने हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे
आणि ततसेच लातूर जिल्ह्यात या आधी मोहिनी भिसे या मुलीने पण हुंड्यासाठी आत्महत्या केली होती.त्यामुळे हुंडाबंदी साठी मराठा समाजातील बाधंवानी पुढाकार घेणे गरजेचे आहे आणि मराठा समाजातील प्रत्येक तरूणाने हुडां घेेवू नये पालकांनी हुडा देणार नाही आणि घेणार नाही अशी शफथ घ्यावीआणि प्रत्येक बहिणीच्या भावाने विचार करायला पाहीजे कि आपण आपल्या बहिनीच्या लग्नात हुंडा द्यायचा नाही आणि आपल्या लग्नात पण हुंडा घ्यायचा नाही कारण ती पण एका भावाची बहीण आहे.हुंडा प्रथेमूळे आज आपल्या गावातील 2 निष्पाप बहिणींचा जीव गेला त्या पण आपल्या बहिणीचं होत्या.त्या बहिणींना खरी श्रद्धांजली द्यायची असल तर आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील मराठा युवकांनी आपल्या लग्नात हुंडा घेणार नाही आणि बहिणीच्या लग्नात हुंडा देणार नाही हि संकल्पना निर्माण केली पाहिजे.आपल्या घरच्यांना आई वडिलांना समाजाला हुंडा बंदी प्रथा बंद करण्यासाठी तयार केले पाहिजे.आणि हुंडाबंदी करण्यासाठी सुरुवात हि आपल्या गावातून केली पाहिजे. समाजात लग्न करण्याच्या बाबतीत पन चढाओढ दिसत आहे.युवकांच एक संघटन झालं पाहिजे.आणि या संघटनाच्या माध्यमातून हुंडाबंदीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मित्रांनो,वडीलधाऱ्यांनो,भावाच्या बहिणींनो आम्हाला तुमची साथ हवीय तुमच्या मदतीशिवाय हुंडा बंदी प्रथेला विरोध करता येणार नाही.सर्वांच्या प्रयत्नांशिवाय हे होऊ शकणार नाही.आणि आज येथे बघायला येणारा प्रत्येक जण हुंडा किती देणार का ?....असा सवाल विचारला जातो. हुंडा मागितला जात असल्याने आज प्रत्येकजण दहशतीखाली जगत आहेलातूरातल्या भिसे वागुली येथील शेतकऱयांच्या दोन मुलींना हुंड्यासाठी आपली जीवनयात्रा संपवावी लागली... अभ्यासू सरकारचा अभ्यास जर वेळेत पूर्ण झाला असता तर किमान शीतलताईंचा तरी जीव वाचला असता... दोन वर्षांपूर्वी भिसे मोहिनी या ताईनेही आपल्या शेतकरी बापाकडे हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती.... ज्या तरूणाला स्वत:ला सिद्ध करण्याची धमक नसते, त्याने स्वत:च्याच लग्नात स्वत:ची विक्री करून घेतलेली लाच म्हणजे हुंडा हा आहे
लेक वाचवा मराठ्यांनो लेक वाचवा....!
सरकार अजून माझ्या किती बहिणींचे बळी जातील?
झोपलेले शासन कधी जागे होणार आहे?आणि हुंडा घेणाऱ्यांनो एकदा या बळी जाणाऱ्या माझ्या बहिणींच्या जागी स्वतःच्या मुलीला पहा रे.....शीतल वायाळ (लातूर) या मराठा मुलीनं आत्महत्या केलीय...बातमी पाहीली अन डोक अगदी सुन्न झाल..जर खरेच मराठा असाल तर - लातूरची शीतल आणि आजवर बळी गेलेल्या हजारो मराठा मुलींसाठी आपण हुंडा देणे आणि घेणे, लग्नात वारेमाप उधळपट्टी करण्याची पद्धत या परंपरा बंद करण्याची शपथ घेऊया हा मराठा समाजाच्या हुंडा घेण्यादेण्याच्या, लग्नात अमाप उधळपट्टी करण्याच्या प्रथेचा आणि मानसिकतेचा बळी आहे
आत्महत्येपूर्वी शीतलने लिहिलेली चिठ्ठी
”मी शीतल व्यंकट वायाळ,
अशी चिठ्ठी लिहिते की माझे वडिल मराठा कुणबी समाजात जन्मले आहेत.
शेतात सलग पाच वर्षे नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीत अत्यंत नाजूक आणि हालाखीची झाली आहे.माझ्या दोन बहिणींची लग्न छोटेखानी पद्धतीने करण्यात आली.पण माझं लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती.
कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्याने दोन वर्षांपासून माझं लग्न खोळंबलं होतं.त्यामुळे मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी,परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.”शीतल वायाळ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा