मुख्य सामग्रीवर वगळा
data-language="en">
दृष्टी बदला, शेती परवडेल!
शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारा निसर्गाचा लहरीपणा.. बी-बियाणे, औषधे, खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती.. बहुतांश वेळा खर्चही भरून निघणार नाही इतपत मिळणारा भाव, या सर्वाची परिणती शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होण्यात होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची ही कथा आहे.
शेतीला लाभदायक होण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव होऊन आधुनिक चौकट आखणाऱ्यांचे हे युग आहे. असे काही केले तरच शेती परवडू शकते. शिवाय निव्वळ शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतीपूरक अनेक व्यवसायांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील सॉफ्टवेअर अभियंता दीपक पाटील यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करताना त्यास शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन ते कुटुंबीयांचा आधारवड बनले आहेत. पाटील यांनी नोकरी सोडून वडिलांसह काकांनी सुरू केलेल्या शेतीपूरक दुग्ध व्यवसायात झोकून दिले. ते केवळ दुग्ध व्यवसायावरच थांबले नाहीत, तर त्यात कुक्कुटपालनाची भर घातली. इतकेच नव्हे, तर भविष्यात शेळीपालन करण्याचाही त्यांचा विचार आहे. म्हणजेच शेतीपूरक जे काही करता येईल ते सर्व करण्याचा त्यांचा ध्यास आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सतत दुष्काळाच्या चक्रात होरपळणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी प्रगतीची नवीन वाट दाखवून दिली आहे.
बाराही महिने दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांपैकी कलमाडी हे एक गाव. शेकडो एकर शेती असलेले शेतमालकही या तालुक्यात कधी काळी मुबलक प्रमाणात होते. पुरेसे पाणी नाही म्हणून शेती तुकडय़ातुकडय़ांनी सावकारांसह व्यापारी, उद्योजकांना देण्याशिवाय अनेकांकडे पर्याय उरला नाही. असे व्यवहार करून अनेकांनी शक्य तेवढी रोकड मिळविली, पण वडिलोपार्जित शेती कसणाऱ्या प्रकाश पाटील आणि राजेंद्र पाटील या भावंडांनी कलमाडीकरांसमोर एक नवा आदर्श घालून देण्याचा संकल्प केला. आधुनिक पद्धतीने शेती करून याच जमिनीचा उपयोग त्यांनी चारा निर्माण करण्यासाठी केला. दुभत्या जनावरांना हा मुबलक चारा चारून आपल्याच एके काळच्या कोरडवाहू जमिनीतून दुधाची गंगाजळी कशी उगम पाऊ शकते, याचे उदाहरण उभे केले. जनावरांना पुरेल एवढे पाणी या शेतीत उपलब्ध होत नसेल, तर प्रसंगी टँकर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाणी आणले जाते.
विशिष्ट जातीच्या गाई या दूधगंगेला वाहती ठेवण्यात मोलाच्या ठरल्या आहेत.
पाटील कुटुंबीयांना पावसाचा अभाव आणि सतत पडणारे शेतमालाचे भाव यामुळे शेती करणे परवडतच नव्हते. यामुळे दोन वर्षांपूर्वी शेती व्यवसायाला पूरक असा दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी म्हशीऐवजी अधिक दूध देणारी गाय पाळावी असे ठरले. एक, दोन गाई या कुटुंबीयांचा आधार ठरू लागल्या. त्याला कारण स्वमालकीची शेती आणि या शेतीतून पिकाऐवजी उत्पादित होणारा मुबलक चारा. यामुळे दुभत्या जनावरांच्या उदरभरणासह पाटील कुटुंबीयांचेही प्रश्न सुटले आहेत. सुरुवातीला लहान प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या दूध व्यवसायात आर्थिक सुबत्ता आल्याने दुभती जनावरे वाढविण्याचा विचार अमलात आला. दुग्ध व्यवसायाला मिळालेली चालना या कुटुंबीयांचा उत्साह वाढविणारी ठरली आणि आधुनिकतेच्या स्पर्शाने दुधाची अनपेक्षित वाढ झाली. सततच्या दुष्काळामुळे न परवडणारी शेतीच दुग्धोत्पादनामुळे परवडू लागली आहे.
अभियंता असलेल्या दीपक पाटील यांनाही कलमाडी येथील आपल्या गोठय़ात राबण्याचा मोह आवरता आला नाही. दीपक हा प्रकाश पाटील यांचा मुलगा. त्याने नोकरी सोडून दुग्धोत्पादनाच्या व्यवसायात झोकून दिले आहे. त्याने गोठय़ात केलेले बदल दुग्ध व्यवसायाच्या वृद्धीसाठी पूरक ठरले आहेत. पाटील कुटुंबीयांनी केलेले गाईंचे पालन बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आता इतर जिल्ह्यांतूनही शेतकरी येथे भेट देऊ लागले आहेत. हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना पाटील बांधवांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शिंदखेडा तालुका दुष्काळी आहे. सुलवाडे, वाडी, शेवाडी, अमरावती, जामफळ ही धरणे या भागातील शेतीला वरदान ठरायला हवी होती, पण धरणांतील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीला धरणातील पाणी मिळणे कठीण झाले आहे. विविध योजनांच्या घोषणा केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या ठरल्याचे आरोप होतात. कलमाडी आणि माळीच या गावांना दुष्काळाची अधिकच झळ बसत आहे. विहिरी साधारणपणे ९० तर कूपनलिका ५०० ते ७०० फूट खोल गेल्यानंतरही पाण्याचा लवलेश दिसत नाही. यामुळे पाटील बंधूंनी सुरू केलेला दुग्ध व्यवसाय हा आदर्श मानून परिसरातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळू लागले आहेत.
दुष्काळाचा शाप असला तरी शेती मुबलक उत्पादन देऊ शकते याची खात्री असल्याचे दीपक पाटील सांगतात. दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक अनेक व्यवसाय डोळ्यासमोर आले. घरच्या शेतीमुळे त्यातील दुग्ध व्यवसाय निवडला. या व्यवसायातून आर्थिक बळ मिळाले. आता शेळीपालन सुरू
करण्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरांमध्ये जाऊन कित्येक वर्षे केवळ पाच ते १० हजार रुपयांची नोकरी करणारे अनेक जण आहेत. घरी शेती असतानाही शेतीत बदल न करता ही मंडळी शहरांमध्ये काम करताना दिसतात. अशा युवकांनी पुन्हा शेतीकडे वळावे, शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा, हेच पाटील कुटुंबीयांकडून शिकावयास मिळते.
पाटील कुटुंब ४० वर्षांपासून शेती कसत आहे; परंतु पाऊस आणि पडलेले भाव यांमुळे शेती परवडत नसल्याने ते हताश झाले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाटील बंधूंनी राज्यात विविध ठिकाणी भेट दिली. त्यातून मिळालेल्या माहितीला त्यांनी शेतीला दुग्धोत्पादनाची जोड दिली. आज या कुटुंबीयांच्या शेतात पिकाऐवजी देशी आणि होस्टेन गाई दिसतात. पाटील यांच्या गोठय़ात आता १७ गाई आहेत. या गाई दररोज साधारणपणे ५०० लिटर दूध देतात. गाईंचे दूध डबल बकेट या आधुनिक यंत्राने काढले जाते. गाईंचे संभाव्य आजार टाळण्यासाठी सुसज्ज शेड तर आहेच, शिवाय आजार पसरविणाऱ्या माश्या, गोचीड किंवा कीटक होऊ नयेत यासाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे.
प्रकाश पाटील हे ३५ एकरांच्या शेतीत इतर मोठी पिके घेण्यापेक्षा दूधवाढीला पोषक ठरणारी चारापिकेच अधिक घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने घास, मका आणि ऊस या पिकांचा समावेश आहे. गाईंना दररोजचा नियमित आहार किलोग्रॅममध्ये मोजूनच दिला जातो. दुग्धोत्पादनाबरोबर त्यांनी देशी आणि चिनी कोंबडय़ांचे पालनही सुरू केले आहे. प्रामुख्याने गिरिराज, गावरान, कडकनाथ, व्हाइट लेव्हन अशा कोंबडय़ा येथे पाहायला मिळतात. कडकनाथ या जातीच्या कोंबडीला मागणी अधिक असल्याने दीपक पाटील यांनी कडकनाथ कोंबडीची अंडी आपल्या गावरान कोंबडीखाली ठेवून उबविण्याचा प्रयोग केला आहे. कोंबडय़ांना खुराडय़ात न कोंडता शेतात मोकळेच सोडलेले असते. शेतातील उकिरडय़ांवरच या विविध जातीच्या कोंबडय़ांना खाद्य उपलब्ध होते. 
No automatic alt text available.
data-language="en">

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला बलात्कार हा अंगावर श
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्रतिसाद मिळाला न
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे  आणि ततसेच लातूर
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. लॉजमालक इतर महिला व ग्राहकांना बोलावून घेत त्यांच्याकडू
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर्भपात आणि सोनो
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे आविनाश त