मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सरकारची आश्वासने आणि मराठा समाज ⛳ निलेश चाळक ईमेल,nileshchalak7@gmail.comवाँटस्प नबंर,9767894619(मला खालील माझ्या प्रश्नाची उत्तरे ईमेलवर किंवा वाँटस्पवर पाठवा ⛳ *मराठा आरक्षणासाठी राज्यसरकार अनुकूल : मुख्यमंत्री* पण कधी गेल्या तीन वर्षापासून हेच ऐकतोय आम्ही कि मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल आहे आणि भाजपा सरकारच मराठा समाजाला आरक्षण देणार आहे परंतू तीन वर्ष झाले सत्ता येवून तरी ही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही आणि हेच अजून सागंत आहात कि मराठा आरक्षणासाठी सरकार अनूकूल आहे अह ो साहेब आरक्षण नसल्यामुळे आमचे अनेक भाऊ बहीण शिक्षणापासून वचिंत आहेत लाखो रूपये फिस भरून ही नोकरी लागत नाही नोकरी मिळेल या आशेने घर दार विकून रस्त्यावर येण्याची वेळ मराठा समाजावर आली तर सततच्या नापिकीमुळे मराठा शेतकरी आत्महत्या करत आहते तर लाखो रूपये खर्चून ही नोकरी लागत नसल्याने मराठा तरूण /तरूणी आत्महत्या सारखा मार्ग अवलबित आहेत त्यामुळे साहेब आम्हाला आश्वासन नको तर तुम्ही कुर्ती करा व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या *आरक्षणाचा मुद्दा मागासवर्गीय मंडळाकडे* मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास...
आज साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित  आभिवादन करताना मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समिती जिल्हाप्रमुख निलेश चाळक,शिवकार्य प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक अशोक ढोले,निलेश उपरे व आदी
सर श्रावणाची सांगे ,गोड गुपीत कानांत! झुला फांदीवरचा ग,श्रावणाचे गातो गीत ! निलेश चाळक नागपंचमी विशेष  आज राज्यासह बीड जिल्ह्यात आनेक ठिकाणी नागंपचंमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे   सर श्रावणाची सांगे, गोड गुपित कानांत । झुला फांदीवरचा ग, श्रावणाचे गातो गीत ।ह्या ओळी ऐकल्या, की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमी साठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. झोक्यांवर झुलणार्‍या मुली आठवतात. दारीफेर धरून चाललेली नागपंचमी गाणी आठवतात. “ चल ग स सखे वारूळाला- नागोबाला पुजायला…” या ओळी ओठावर येतात. कारण श्रावण महिन्यांतला नागपंचमी हा पहिला सण, नागपंचमी या सणाची सर्व महीला मुली मोठ्या आतूरतेने वाट पहात असतात ग्रामीण भागात दहा दिवसा आगोदर पासून नागपंचमी या सणाची तयारी केली जाते नागपंचमी निम्मित झोके खेळण्याचा आनंद महीला सह तरूण वर्ग मोठ्या उत्साहात घेतात आणि ग्रामीण भागात पंचमीचा सण दोन दिवस साजरा केला जातो नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्या...
वर्षांभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...!   निलेश चाळक बीड मो ,९७६७८४६१९ देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' मात्र वर्षभरनतंर ही  न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कधी मिळणार कोपर्डीतील श्रध्दाला न्याय ? असा सवाल आत्ता  उपस्थित होत आहे , महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ईतिहासात तेरा जूलै हा काळाकुट दिवस आहे या दिवसाने मराठ्यांना मराठा समाजाला हादरवून टाकले होते आणि संवेदनशिल मनं हेलावून टाकली होती परंतू या ढिम्म सरकारमुळे कोपर्डीतील मराठा ताईला न्याय मिळाला नाही आज कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना फाशीची शिक्षा झालेली नाही ज्यावेळी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिली होती त्यावेळी मु्यमंञी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि आरोपीना सहा महीण्याच्या आत फाशीची शिक्षा दिली...