सर श्रावणाची सांगे ,गोड गुपीत कानांत! झुला फांदीवरचा ग,श्रावणाचे गातो गीत !
निलेश चाळक नागपंचमी विशेष
आज राज्यासह बीड जिल्ह्यात आनेक ठिकाणी नागंपचंमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे सर श्रावणाची सांगे, गोड गुपित कानांत ।
झुला फांदीवरचा ग, श्रावणाचे गातो गीत ।ह्या ओळी ऐकल्या, की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमी साठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. झोक्यांवर झुलणार्या मुली आठवतात. दारीफेर धरून चाललेली नागपंचमी गाणी आठवतात.
“ चल ग स सखे वारूळाला- नागोबाला पुजायला…” या ओळी ओठावर येतात. कारण श्रावण महिन्यांतला नागपंचमी हा पहिला सण, नागपंचमी या सणाची सर्व महीला मुली मोठ्या आतूरतेने वाट पहात असतात ग्रामीण भागात दहा दिवसा आगोदर पासून नागपंचमी या सणाची तयारी केली जाते नागपंचमी निम्मित झोके खेळण्याचा आनंद महीला सह तरूण वर्ग मोठ्या उत्साहात घेतात आणि ग्रामीण भागात पंचमीचा सण दोन दिवस साजरा केला जातो
नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा.
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा