नोटावर बंदी ; विवाह समारभं खोळबंले
निलेश चाळक बीड
मोदी सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. लोकांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. कोणी आजारी पडलेच तर रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. व तसेच बीड जिल्ह्यातील अनेक गावांत विवाह समारंभही थांबले आहेत.तर काी ठिकाणी लग्न करणार्या मुला-मुलीच्या विवाहच्या विधीसाठी लागनारे समान खरेदी करण्यासाठी जिथे दोनशे रूपयाची वस्तू खरेदी करायची असेल तिथे हजाराची वस्तू खरेदी करावी लागत आहे यासह आऱ्थिक भुर्दंड विवाह कार्यक्रमांत सहन करावा लागत असल्याने बीड अनेक ठिकाणचे विवाहसमांरभ पुढे ढकल्णयात येत आहेत याबाबत आधिक माहीती अशी कि देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी व भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकारने 500य1000रूपयांच्या नोटावर बंदी आणली परंतू ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार रोखीनेच होतात. फारच थोड्या लोकांची बँकेत खाती आहेत. खाती असणारेही क्वचितच बँकांमार्फत व्यवहार करतात. रोखीच्या व्यवहारासाठी नोटाच नसल्यामुळे लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.आणि एटीएम वर मोठी गर्दी उसळली आहे या सर्व गोष्टीमुळे जिल्ह्यातील विवाह समांरभ खोळबंले आहेत व बीड शहारातील तालूक्याच्याठिकाणी बँकामध्ये नागरीकाची तर दुसरीकडे ग्रामीण भागातील बँकात गावकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यात महिलांचा समावेश अधिक आहे. बँकेत नोटा आल्याचे कळताच लोक उतावीळ झाल्याचे दिसून येते. नोटा लवकरच संपून जातात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा