कापसाला सात हजार रूपये हमीभाव जाहीर करा - निलेश मोहीते
बीड-
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची झालेली निराशा व या वर्षी चागला पाऊस झाला हे खरे असले तरी काही दिवसापुर्वी झालेल्या अतिवर्ष्टीमुळे शेतकर्याचे खुप नुकसान झाले आहे व कापसाचे पाते गळून गेले आहेत तर काही ठिकाणी कापसाची बोंडे कूजून गेली आहेत त्यामुळे यावर्षी कापसाच्या जास्तीत जास्त दोन वेळा वेचणी होईल आत्ता ग्रामीण भागात कापूस वेचणीला जोर आला असला तरी अनेक ठिकाणी मजूराअभावी कापसाच्या वेचण्या झालेल्या नाहीत तर शेतातील कापूस न वेचल्याने उन्हाने कापसाचे वजन कमी होत आहे तर दुसरीकडे ज्या शेतकर्यानी कापसाची वेचणी केली आहे ते शेतकरी कापूस हमी भावाची वाट बघत आहेत तर दुसरीकडे बाहेरच्या व्यापार्यनी कापूस खरेदी सुरू केली आहे परंतू हे व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्यामुळे शासने कापसाला सात हजार रूपये भाव देण्याची मागणी बहीरवाडी (माळापुरी ) गटाचे युवा नेते निलेश मोहीते यानी केली आहे
या बाबत अधिक माहीती अशी कि बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात झालेल्या अतिवर्ष्टीमुळे कापसाचे कमी झालेले क्षेत्र आणि घटलेले उत्पादन यामुळे यंदाही कापूस बाजार काळवंडलेलाच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. अजून सरकारी खरेदी सुरू झाली नसली, तरी मराठवाड्यातील ,औरगांबाद, बीड ,लातूरमध्य़े राज्या बाहेरील व्यापार्यानी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे व हे व्यापारी पाच हजार रूपये क्विटंल दराने कापूस खरेदी करत आहेत व तसेच शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण कमी करायचे असल्यास कापसाला सात हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी बहीरवाडी (माळापुरी ) गटाचे युवा नेते निलेश मोहीते यानी केली आहे व तसेच लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजप नेते ( पतंप्रधान ) नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २० मार्च २०१४ ला आयोजित केलेल्या ‘ चाय पे चर्चा ’ कार्यक्रमात शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव दिल्या जाईल, अशी घोषणा केली होती.नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आता पंतप्रधानांनीच लक्ष घालून कापसाला सात हजार रूपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी बहीरवाडी (माळापुरी ) गटाचे युवा नेते निलेश मोहीते यानी केली आहे
कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा