आज नागपुरात तख्तासाठी विखुरलेला मराठा अाता रक्तासाठी एकत्र येतोय...!
कोपर्डीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहे व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चाआज नागपुरात जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चा एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होत आहेत त्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या प्रमुख तीन मागण्या करण्यात येत आहेत त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता नाागपुरातील मोर्चाला समोर येऊन चर्चा करावी
१७ व्या शतकात स्वराज्य उभारणीला काही हजार मावळ्यानिशी सुरुवात झाली होती त्याचे १८ व्या शतकात लाखोंच्या सेनासागरात रुपांतर झालं.इतका सशस्त्र सेनासागर कि आश्चर्याने आणि भीतीने नजरबंदी व्हावी. असाच नजरबंदी करणारा निशस्त्र मराठ्यांचा जनसागर त्याच लष्करी शिस्तीत संपूर्ण महाराष्ट्रातून वाहू लागला आहे.त्यामुळे आज मराठा जातीवर उतरतोय त्याला उतरू द्या , मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय
मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या नाहीतर ज्यांच्याकडे हिसकावून घेण्याची ताकद असते ते शांतताप्रिय पद्धतीने सहसा कधीच मागणी करत नाहीत. याच तत्वाने जाट,पाटीदार या क्षत्रिय बांधवांनी हिंसक पद्धतीने आंदोलने केली ज्यात अनेक जीव गेले, मालमत्तेचे नुकसान झाले, जनजीवन ठप्प झाले. मराठ्यांनी या उलट हिंसा,घोषणाबाजी,आंदोलन ना करता मूक मोर्चे काढून दाखवून दिलं कि संयम आणि सत्वशीलता हि शिवछत्रपतींनी शिकवलेली मूल्ये आमच्यात किती खोलवर रुजली आहेत.
महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीनंतर इतक्या मोठ्या संख्येने शांततापूर्ण मार्गाने मोर्चे निघण्याची हि बहुदा पहिलीच वेळ आहे. किंबहुना भारतात झालेल्या कोणत्याही आंदोलनाचे ,मोर्च्याचे गर्दीचे रेकॉर्ड्स या मोर्चाने मोडीत काढले आहेत.तरीही काही उपद्रवी मूल्ये मराठ्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही मीडियावाले याला मराठ्यांची दादागिरी म्हणत आहेत तर काही जण राजकीय रंग भरत आहेत.मराठ्यांना दादागिरी करायची असती, जोर लावायचा असता,जहालपणा दाखवायचा असता तर महाराष्ट्र पेटवून मराठे कधीच मोकळे झाले असते . पण परकीयांच्या आक्रमणाने विखुरलेल्या या देशाला,महाराष्ट्राला एकसंध करण्याचं, पुनरुभारणी करण्याचं काम मराठ्यांनी केलं, ते या देशातल्या कागदाच्या तुकड्याचेही नुकसान करणार नाहीत. कारण आमच्या जातीचा इतिहास हा देशाच्या मातीशी जोडला गेलाय ते हि रक्ताने.
आमचे मोर्चे हे स्वयंस्फूर्तीने उभे राहिले आहेत कोणी दादा,मामा,अण्णा,बुवा,साहेब,शिक्षणसम्राट,साखरसम्राट आमचे नेते नाहीत.होय आमच्यातले काही हिंदुत्ववादी आहेत,काही समाजवादी आहेत काही पुरोगामी आहेत,नास्तिक,आस्तिक आहेत पण मोर्चात आम्ही आमचे हे मुखवटे काढून फक्त आणि फक्त मराठा या आमच्या अस्सल चेहऱ्याने सामील होत आहेत
या मोर्चाचा नेता आणि स्फुर्तीदाता जर कोणी असेल तर ते आमचे छत्रपती शिवराय आहेत. जे आम्हाला या मोर्च्यादरम्यान शिस्त ,स्वच्छता,संयम आणि संघटन करण्यास मार्गदर्शन करत आहेत.
जेव्हा कोपर्डीची घटनेमध्ये एवढ्या क्रूर पद्धतीने एका निरपराध मुलीची हत्या होते, आपण काहीच करू शकत नाही अशी भावाना समाजामध्ये रूजायला लागली. महिलेवर अत्याचार केला म्हणून आपल्याच समाजाच्या रांझ्याच्या पाटलाचाही चौरंग मराठ्यांनी केला ,नोकरी,शिक्षण,राजकारण यामधील आरक्षणातून, कायद्याने दिलेल्या संरक्षणाच्या माध्यमातून इतरांना कायम 'जातीवर' उतरण्याची संधी मिळत गेली. मराठ्यांनी याबाबत तक्रार कधीच नाही केली याउलट राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
मराठ्यांनी आवाज काढला तर दिल्लीत बसलेल्यांनाही कानठळ्या बसतील यात शंका नाही. आज मराठा जातीवर उतरतोय त्याला उतरू द्या , मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या आणि त्याचे निर्णयात रूपांतर करा.
१७ व्या , १८व्या शतकात मराठ्यांच्या लाखोंच्या सशस्त्र फौजांपुढे सर्व उपद्रवी शक्तींनी हात टेकले ,भारतीय उपखंडात जिथे जिथे म्हणून मराठे शिरले तिथे विजयाचा गुलाल उधळला . आज त्याची जागा "शिस्त ,स्वच्छता आणि संयम " राखून लाखोंच्या मूक आणि निशस्त्र मोर्चाने घेतली असली तरी निकाल तोच लागेल जो पूर्वी लागला
निलेश चाळक मो,9767894619
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा