नोटाबंदीचा फायदा सर्वसामान्याना कि मोठ्या उद्योजकांना
सर्वसामान्य शेतकरी वर्ग अडचणीत
त्र्येंपन्न दिवसानतंर ही बँकेत गर्दी कायम
निलेश चाळक -बीड
नरेंन्द्र मोदी यांनी ८ नोंव्हेबर रोजी काळे धन बाहेर यावे या साठी ५०० व १००० रु च्या नोटा बंद करुन काळे धनावाल्यांना मोठा धक्का दिला होता. आणि ५०० व १००० रु च्या नोटा ५० दिवसात बँकेत आपल्या खात्यावर जमा करा असे फरमान काढले होते. नोटा बंदिचे फरमान काही मिनटातच काढले परंतु याची झल सर्व सामान्यांना बसली तर अनेकांना रांगेत उभा असतांना आपला जिव गमावा लागला. ५० दिवस उलटले तरी नोटा बंदीची मंदी कायम असल्याने सर्व सामान्य माणुस आज देखील बेजार आहे.
पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी ५०० व १००० रु च्या नोटा चलनातुन बाद करून आज दोन महीने होत आले तरी बीड जिल्ह्यात सर्ब तालूक्याच्या बँकेत गर्दी कायम आहे व तसेच नोटांबदीच्या निर्णयानतंर पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कि मला ५० दिवसाची मुदत द्या परिस्थिती पुन्हा नोटा बंदी निर्णयाच्या आगोदर सारखी होईल परंतु ५० दिवस उलटून गेल्या नतंरही शहरांच्या व ग्रामीण भागाच्या ठिकाणी असलेल्या आज ही गर्दी कायम आहे तर दुसरीकडे नोटाबदींचा फायदा सर्वसामान्याना कि मोठ्या उद्योजकाना असा सवाल जन माणसातून उपस्थित केला जात आहे
व तसेच नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरात प्लॅस्टिक मनी आणि ‘पे-टीएम‘सारख्या मोबाईल ऍप्लिकेशनचा वापरही वाढला आहे. ‘पे-टीएम‘च्या एकूण व्यवहारांत दोनशे टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ‘मोदी यांच्या निर्णयामुळे ‘पे-टीएम‘च्या व्यवहारात मोठी वाढ झाली. पेटीएम म्हणजे काय ? हे सर्वसामन्या शेतकर्याना माहीत नसल्यामुळे सर्वसामन्या शेतकर्याना अनेक अडचणीना समोरे जावे लागत आहे.

चौकट
नोटाबंदी नतंर उद्योजकां एेवजी सर्वसामान्या शेतकरीच बँकेच्या रांगेत
पतंप्रधान नरेंद्र मोदी यानी काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी दि,8 नोव्हेबर रोजी 500 व 1000 रूपयाच्या नोटावर बंदीचा निर्णय घेतला होता परंतू पतंप्रधान नरेंद्र मोदी यानी नोटा बदलण्यासाठी ३० डिसेंबर पर्यत मुदत दिली होती परंतू या नोटा बदलण्याच्या कालावधीत मोठे उद्योजक व श्रींमताएेवजी सर्वसामान्या शेतकरीच बँकेच्या रांगेत उभा रहाताना दिसून दिसत आहे तर श्रींमत व मोठे उद्योजक मात्र बँकेच्या रांगेत उभा राहीलेला दिसून येत नाही तर नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्या शेतकर्ना दिवस दिवस भर बँकेच्या रागेंत उभे रहावे लागत होते
चौकट
नोटाबदलण्यासाठी अनेकांना गमवावा लागला जीव
पतंप्रधान नरेंद्र मोदी यानी नोटाबदीचा निर्णय घेतल्यानतंर बँकेत नोटांबदलून घेण्यासाठी बँकेत दिवस व दोन दोन दिवस बँकेत रागेंला उभे रहावे लागत होते देशभरांत बँकेच्या रागेंत उभा राहून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर चक्कर येण्याने विवीध कारणाने काही नागरीकांवर दवाखाण्यात उपचार सुरू आहेत
चौकट
जुन्या नोटांने कापूस विकल्यास 5000 हजार तर नव्या नोटांने 3500 व 4000 हजार रूपये भाव
पतंप्रधान नरेंद्र मोदी यानी काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी दि,8 नोव्हेबर रोजी 500 व 1000 रूपयाच्या नोटावर बंदीचा निर्णय घेतला होता या निर्णयांचे सर्व सामान्य शेतकर्यांनी जरी स्वागत केले असले तरी आज ग्रामीण भागातील शेतकर्याकडूंन कापुस खरेदी करताना शेतकर्याचा कापूस विकायचा असल्यास त्याच्याकडून कापूस दोन भावाने खरेदी केला जातो म्हणजेच जर शेतकर्याना ापूस विकायचा असेल तर जुन्या नोटांने कापूस विकल्यास 5000 हजार तर नव्या नोटांने 3500 व 4000 हजार रूपये भाव शेतकर्याना मिळत आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडून त्रीव भाजपा सरकार विरोधात व्यक्त केली जात आहे
चौकट
गुजरातच्या व्यापार्यानी महाराष्ट्रांत व बीड जिल्ह्यात २० टक्के कमीशनने चिल्लर पुरवल्याची चर्चा
पतंप्रधान नरेंद्र मोदी यानी नोटांबदी केल्यानतंर देशभरांत चिल्लरची कमतरता निर्माण झाली होती त्यांमुळे सर्वसामाण्याना अनेक अडचणीनां समोरे जावे लागत होते या गोष्टीचा फायदा काही व्यापार्यांनी घेत गुजरातहून आलेल्या काही व्यापार्यानी राज्यांत व जिल्ह्यात गुजरातच्या व्यापार्यानी महाराष्ट्रांत व बीड जिल्ह्यात २० टक्के कमीशनने चिल्लर पुरवल्याची चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे
चौकट
नोटाबंदीने लग्नाच्या तारखा बदलल्या
मोदी सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. लोकांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. कोणी आजारी पडलेच तर रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. व तसेच बीड जिल्ह्यातील अनेक गावांत विवाह समारंभांच्या तारखी पुढे ढकलल्याचे दिसून येत आहे कारण. लग्न करणार्या मुला-मुलीच्या विवाहच्या विधीसाठी लागनारे समान खरेदी करण्यासाठी जिथे दोनशे रूपयाची वस्तू खरेदी करायची असेल तिथे हजाराची वस्तू खरेदी करावी लागत आहे यासह आऱ्थिक भुर्दंड विवाह कार्यक्रमांत सहन करावा लागत असल्याने बीड अनेक ठिकाणचे विवाहसमांरभ पुढे ढकलण्यात येत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा