निलेश चाळक बीड- शहरातील शाळा- महाविद्यालय आवारासह बसस्थानक व परिसरात रोडरोअमिओंचा मोठा उच्छाद वाढला आहे़ रस्त्यावर, शाळा- महाविद्यालयाच्या आवारासह इतरत्र कोठेही छेड काढणाऱ्या रोडरोमिओंमुळे मुली व महीला त्रस्त झाल्या आहेत़ खाजगी शिकवणीच्या परिसरातही रोडरोमिओंचा उच्छाद वाढल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अशा रोडरोअमीचा बदोंबस्त करण्याची मागणी शहरातील पालकवर्गातून होत आहे
बीड शहरातील बलभीम कोेलेज ,नवगण कोलेज ,माने काँम्पल्यास ,सिधिविनायक काँम्पल्यास,व डि,पी रोड,राीव गांधी चौक, गार्डन रोड व तसेच खाजगी क्लासेसच्या परिसरांत मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंनी मोठा धुमाकूळ घातला आहे़ तर भीतीपोठी अनेक मुली शिक्षकांसह नातेवाईकांना माहिती देत नाहीत़ मुलींकडून तक्रारी होत नसल्याने अनेक रोडोमिओंनी भरधाव वेगात दुचाकी नेणे, दुचाकीवरून ट्रिपलशीट फिरत मुलींची छेड काढण्याचा प्रकार सुरू केला आहे़ विशेषत: भरधाव वेगातील आणि वाहतूक नियम मोडणाऱ्या युवकांकडे सुरक्षा रक्षकांसह शाळा-महाविद्यालय प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे अशा रोडरोअिओना लगाम लावण्यासाठी बीडला आलेले नुतून पोलीस आध्यक्ष जी श्रीधर हे काय मोहीम राबवणार याकडे पालकवर्गाचे लक्ष लागले आहे
व तसेच बीड शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना या रोडरोअमीओचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे व तसेच शाळा - कोँलेजच्या मुलींच्या वस्तीगृहाच्या आवारातही अनेक रोडरोमिओ हिरोगिरी करताना वेळोवेळी दिसून येतात़ त्यामुळे या रोडरोमिओंमुळे मुलींना होणारा त्रास पाहता पोलिसांनी धडक कारवाई मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे़
चौकट
चिडीमार पथकांच्या कारवाया थंडावल्या
बीड शहरातील महीला मुलीची छेंडछाडी व रोडरोअमीओचा शहरातील उच्छाद पहाता बीडचे तात्कालीन पोलीस आध्यक्ष आनिल पारसकर यानी शहरात जिल्ह्यात चिडीमार पथकांची स्थापना केली होती व या पथकांने चागंली कामगिरी केली परंतू एक ते दोन महीन्यापासून या पथकांच्या कारवाया थंडावल्या मुळे
मुळे शहरात रोडरोअमिओंनी जास्त उच्छाद मांडला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा