ढगाळ वातावरणाने पिकांवर घाटीअळीचा प्रादुर्भाव
हरभारा, ऊस, हळद कोमात , ज्वारीचे जोमात
निलेश चाळक बीड - कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ठिक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर ऊस, हळद व शेतातील भाजीपाल्यावर वेगवेगळ्या रोगाचा लागन होण्याची संभावना आहे. तर हरभा-यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव जास्त झाला असुन, ज्वारीचे पिक माञ जोमात आहे.
ढगाळ वातावरण झाल्याने ज्वारीची वाढ जोमात होऊ लागली आहे. तसेच यावर्षी रबी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारीबरोबर हरभरा, गहू, ऊस,व हळद या पिकांवर जास्त भर दिला आहे. मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंडी गायब झाली आहे. हरभऱा या पिकाची वाढ जोमात झालेली असतानाच हरभा-यारा ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून, अशा वेळेत पाऊस पडल्यास निसवलेल्या गव्हाच्या वोब्यांचा रंग बदलून पांढरा पडण्याची शक्यता आहे. व थंडीमुळे ज्वारीची जोमाने वाढ होऊ लागली आहे. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाने सागिंतलेल्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच ऊस पिकावर पांढरी माशी किडीचा प्रभाव दिसुन येत असल्यास नियंञाणासाठी डायमिथोएट २७ मि. ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी व हळद कंदभरण्याच्या आवस्थेत करपा रंगाच्या नियंञाणासाठी डायथेन एम ४५ + कार्बेन्डेझिम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी जेणे करुन पिक जोमात येईल व शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होइल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा