जि.प निवडणुकित दिग्गज नेत्यांच्या वारसदाराची मुसंडी
निलेश चाळक बीड-जि.प निवडणुकित दिग्गज नेत्यांच्या वारसदारांनी जोरदार मुसंडी मारुन आपला दबदबा कायम ठेवला असून यामध्ये एका माजी मंत्र्यांच्या पत्नीसह ,सून, पुत्र निवडूण आले आहेत तर दुसरीकडे एका माजी आमदाराच्या पुत्रालाही निवडून देत मतदारांनी राजकीय घराणेशाहीच्या बाजूने कौल दिला आहे .याबाबत आधिक माहीती अशी कि
बीड येथील माजी मंत्री शिवाजीराव पंडित याचें सुपुत्र तथा जि.प चे विद्यमान अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी चकलांबा जिल्हा परिषद गटातून बहूमत मिळवत चागलीच मुसंडी मारून विजय मिळवला आहे तर दुसरी कडे माजीमंत्री बदामराव पंडित यांचे पुत्र तथा उमापुर जि,प गटाचे विद्यमान जि,प,सदस्य युद्धजित पंडित यांनी ही उमापुर जिल्हा परिषद गटातून बहूमत मिळवत चागलीच मुसंडी मारून विजय मिळवला आहे
आणि विजयसिंह आणि युद्धजित हे नात्याने चुलतबंधू आहेत.तर माजलगाव तालूक्यातून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके व पुतणे जयसिंह सोळंके हे ही पहिल्यांदाच जि.प. मध्ये दाखल झाले आहेत.तर परळी तालुक्यातील धर्मापुरी जि. प. गटातून काँग्रेस- राकॉच्या विद्यमान उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनी विजय संपादन केल असून त्या माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या सुण आहेत.तर दुसरीकडे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे चुलतबंंधू अजय मुंडे यांनी काँग्रेस- राकॉतर्फे विजय मिळवला आहे.आणि बीडमध्ये माजी खा. स्व. केशरबाई क्षीरसागर यांचे नातू व विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजुरी जि.प. गटातून बाजी मारली आहे. स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या सुन सुरेखा क्षीरसागर यांचे सरपंचपदावरुन जि.प. सदस्यपदी राजकीय ‘प्रमोशन’ झाले आहे. त्यांनी बहीरवाडी गटातून सर्वाधिक मते मिळवून विजय प्राप्त केला आहे.आणि चौसाळ्याचे माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांचे पुत्र अशोक लोढा यांनी शिवसंग्रामकडून मुसंडी मारली आहे.तर आष्टीत माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या सुन शोभा दरेकर यानी भाजपकडून निवडून येवून चागलीच मुसंडी मारली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा