शिरूर पोलीसाना भगव्या झेंड्याचे वावडे
कारवाईसाठी शिवप्रेमीचे एस,पी व जिल्हाधिकार्याना निवेदन
बीड,शिरूर -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिम्मित विविध व्याख्यानाच्या जनजाग्रतीसाठी वाहनांना भगवे ध्वज लावून जाग्रती सुरू असताना शिरूर पोलीसानी गाड्यावरील भगवे ध्वज काढा नाही तर गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली यावरून शिरूर पोलीसांना भगव्या झेंड्याचे वावडे आहे कि काय असा संशय व्यक्त होत असून अशा उध्दटपणे वागणार्या पोलीसावर या मागणी साठी एस,पी व जिल्हाधिकार्यांन मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंती निमित व तसेच चार चाकी वाहनांना भगवे झेंडे लावून व्याख्यान व विवीध कार्यक्रमाची जणजाग्रती करण्यासाठी शिवप्रेमी या वाहनातून जात असताना शिरूर येथील जिजामाता चौकात वाहने उभी असताना शिरूर पोलीस ठाण्याच्या काही कर्मचार्यानी येवून वाहनांना लावलेले भगवे झेंडे काढून टाका नाही तर कारवाई केली जाईल असा दम दिला त्यामुळे वाहन धारकांनी भगवे झेंडे काढले आहेत त्यामुळे शिवप्रेमीतून नाराजी व्यक्त केली जात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंती निमित वाहनांना भगवे झेंडे लावणे गुन्हा आहे का असा सवाल शिवप्रेमीतून उपस्थित होत आहे आणि भगव्या झेंड्याचे वावडे असणार्या शिरूर पोलीसाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जालिंदर धांडे ,नितीन पवार ,प्रविन वडमारे, निलेश चाळक , शेळके मिनीनाथ व यावेळी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा