बीड जिल्हा बनला दूध भेसळीचा अड्डा
निलेश चाळक बीड-शासनाने शेतकरी आणि पशूपालकांचा विकास व्हावा यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. परंतू या योजनांचा काही मोजक्याच शेतकऱयांना लाभ झाला असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक मिळणाऱया उत्पन्नाला अधिकचा हातभार लावण्याचे नियोजन करताना दूध भेसळ करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या दुध डेअरीवर दिसून येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या दुध भेसळी मुळे बीड जिल्हा दूध भेसळीचा अड्डा बनत चालल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.परंतू याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे
बीड जिल्ह्यातील अनेक गावात दूध व्यवसाय जोमात चालतो.आणि मोठ्या प्रमाणावर दुध डेअरीवर दुध खरेदी केली जाते तर दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांची जिल्ह्याबाहेर ही विक्री होत असल्याचे बोलले जात आहे तर जिल्ह्यात दुध भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्ह्यातील काही सुज्ञ नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक शेतकर्याचा दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे. त्या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रत्येक घरात 4 ते 5 म्हैशी व जर्सी गायी आहेत. प्रत्येक गावातून रोज 5 ते 6 हजार लिटर दूध उत्पादन होते. आणि गावातून विक्रीसाठी दुध तालूक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणच्या दुधडेअरीवर नेले जाते
आणि तेथून विविध ठिकाणी त्याचा पुरवठा केला जातो.
भेसळयुक्त दुधामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सध्या उन्हाळा सुरू असल्याने बीड जास्त प्रमाणात दुध उपल्ब्ध होत नसल्याने या गोष्टीचा फायदा घेत बीड जिल्ह्यातील अनेक दुध डेअरीचालक कमी दुधात पाणी मिसळून त्यामध्ये मिसळलेले पाणी उघडकीस येऊ नये म्हणून त्या दुधामध्ये गोदरेज पावडर मिसळण्यात येत आहे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे या दुध भेसळीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा