80 वर्षानतंर पुन्हा महाराष्ट्रात शेतकरी संपाच वादळ घुमणार
निलेश चाळक जिरेवाडी मो, 9767894619 , (लेखक मुक्त पत्रकार आहेत)
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आणि नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकऱ्यातून होत आहे त्यामुळे एक जून पासून महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकरी संपावर जाणारच म्हणून ठाम आहे
याबाबत अधिक माहीती अशी कि,येत्या १ जूनपासून कर्ज काढून शेती करण्यापेक्षा संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हातील संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा दुसरा संप असून आत्ता या संपाकडे राज्याचे लक्ष लागले आहे,तर महाराष्ट्रामध्ये 80 वर्षापुर्वी शेतकर्यानी संप पुकारला होता आणि सदरील हा संप सहा वर्ष चालला होता आणि त्या संपाने जरी शेतकरी देशोधडीला लागले असले तरी त्या सहा वर्ष चाललेल्या शेतकरी संपातून काही शेतकरी हिताचे कायदे ही झाले आहेत हे नाकारूण चालणार नाही त्यावेळी त्या संपात स्वताहा , डाँ बाबासाहेब आबेंडकर 80 वर्षापुर्वीच्या शेतकरी संपात शेतकर्याची बाजू मांडली होती ,शेतकरीच्या कापसाला,उसाला, गहू,ज्वारी,बाजरी ,कांदा, द्राक्षे, डांळीब या पिकांसोबतच भाजीपालाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झाला आहे. या संपात महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सहभागी होणार असल्याने संपात शेतकऱ्यांची संख्या लाखाहून अधिक असणार आहे. कर्ज काढून पिकविलेल्या शेतीत नुकसानच सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अल्प भांडवलात कुटुंबाच्या गरजेपुरतेच धान्य पिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपावर जाणारच याच्यावर ठाम आहेत
निलेश चाळक जिरेवाडी 9767894619 (लेखक मुक्त पत्रकार आहेत)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा