जिल्ह्यात आठ दिवसात सर्वाधिक बारा शेतकर्याच्या आत्महत्या
निलेश चाळक बीड
निलेश चाळक बीड
गेल्या
पाच ते सहा वर्षापासून बीड जिल्ह्यात सतत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण
झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत यावर्षी ही
बीड जिल्ह्यात दोन ते तीन
महीण्यापासून पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले
आहेत त्यामुळे गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात बारा शेतकर्यांनी आत्महत्या
करून आपली जीवनयाञा संपवली आहे
गेल्या दोन
महीण्यापासून तुरळीक पडलेल्या पावसाने पिकांची अवस्था वाईट झाली असून काही
ठिकाणी तर शेतकर्यानी उभ्या पिकावर नागंर फिरवला आहे शेतात केलेला खर्च ही
शेतातील उत्पन्नातून निघतो का नाही असा प्रश्न शेतकर्याना उपस्थित होत आहे
पेरणी साठी घेतलेले कर्ज फिटते का नाही अशी चिंता शेतकर्याना भेडसावत आहे
आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर ,कुंटूबाची चिंता अशा अवस्थेत अडकलेल्या
शेतकर्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने शेतकरी
आत्महत्या करत आहेत विभागीय आयुक्त कार्यालय औरगाबाद याच्या कडून
मिळालेल्या माहीतीनुसार 6 आँगस्ट ते 13 आँगस्ट च्या काळात बीड जिल्ह्यात
सर्वाधिक बारा शेतकर्यानी आत्महत्या केल्या धक्कादायक माहीती समोर आली आहे
बीड जिल्ह्यात सतत पडणार्या दुष्काळाने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच
आहे आणि सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा