छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरूण
निलेश चाळक बीड मो, 9767894619
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते
व तसेच शिव जयंती निम्मित19 फेब्रुवारीला तरूण वर्ग मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात या तरूण वर्गाला शिवजयंती साजरी करताना पाहील कि अस वाटत कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसाही पिढी नक्कीच पुढे चालवेल आणि तुम्हाला हव असणार स्वराज्य ही पिढी नक्कीच घडवेल,परंतू शिवजयंतीच्या आनंदाला काही तास ही उलटताय कि नाही या शिवजयंती साजरी करणार्या तरूण वर्गाच दुसर रुप दिसत शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंती सारी करणारे तरूण वर्ग संध्याकाळी दारुच्या नशेत झिंगताना दिसतात,व तसेच छत्रपी शिवाजी महाराज याच्या जयंतीच्या मिरवनुकीत दारुच्या नशेत वेडेवाकडे चाळे करत अश्लिल गाण्यांवर कर्नकक्रश आवाजात नाचताना दिससतात,व तसेच ज्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली व स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्याच वयातील हे तरुन मात्र व्यसनाधिन होवुन वाममार्गाला जावु लागली आहेत,त्यामुळे आज वाईट याच गोष्टीच वाटत की सुपारीचे व्यसन नसणार्या छत्रपती शिवाजी महाराज याच्या सारख्या राजाचे मावळे म्हणवणारी पिढी मात्र तुमचे आदर्श पदोपदी पायदळी तुडवत आहे .एका व्याख्यानात एकल होत की छत्रपती शिवाजी महाराज जर आज घडवायचे असतील तर त्या आगोदर मासाहेब जिजाऊ घडवाव्या लागतील तरच छत्रपती शिवाजी महाराज याच्या सारखा पुत्र तयार होइल. प्रत्येक मातेत खरतर हे सामर्थ असतेच पण विवीध प्रकारच्या सिरीयल्स पाहत मोठ्या झालेल्या किंवा करिना कपुर,कॅटरिना कैफला आदर्श माननार्या आमच्या भगिनी कुठे व आमच्या
रयतेला मुघली जाचातुन सोडवण्यासाठी महाभारत रामायनाचे संस्कार करनार्या राजमाता जिजाऊ कुठे !"
जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगा उद्धारी" ह्या प्रमाने आजच्या मातेने जर ठरवल तरनक्कीच ही तरुनाई वाममार्गाला जाणार नाहीत,पन आमच्या मातांना स्वत:च्या पाल्याच्या आयुष्यात काय चाललय,आपला मुलगा काय करतोय ह्यापेक्षा सिरीयल मधील सासु सुनेला कस छळत यातच जास्त रस त्या घरात खरच शिवाजी जन्माला येईल का??खरतर प्रत्येक मुल हे जन्माने सारखच असत फक्त त्याच्यावरील संस्कार त्याला छत्रपती शिवाजी महाराज बनवत असतात परंतु आमच्याकडे संस्कार करनार्यांचीच खरतर वानवा आहे आणि एवढ होऊन तर आज छत्रपती शिवाजी महाराज याच्या विचारांचे अनुकरन करनारा एखादा जन्मलाच तरीही जीवाला जीव देनारे मावळे भेटन मुश्कील आहे,आजचे आमचे मावळे पहिले विचारतात पगार किती देनार,काहीकाही त्या पुढचे तुम्हाला साथ देतो पन तेवढी दारुपाण्याची सोय करा आणि आमच्या पोलिस केस मिटवा असे ते म्हणतात आजकालचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हनवनारे आणि तुमच्याच्या श्रद्धेच्या नावाखाली आमचे अपराध झाकत असतो,तुमच्यावरच्या श्रद्धेचच प्रदर्शन करण्यासाठी समाजाचेच नियम मोडत असतो,कधी तुमच्या नावाचया नंम्बर प्लेट तर कधी कर्नकर्कष डिजे तर कधी जयंतीच्या नावाखाली वर्गण्या,जनतेच्या सुखासाठी जीवन अर्पन करनारे तुम्हीकुठे आणि तुमच्याच्या नावाखाली जनतेला त्रास देनारे आजचे मावळे कुठे ??असा सवाल उपस्थित होतो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा