ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्यां किर्तनाने जिरेवाडीकर मंत्रमुग्ध
निलेश चाळक बीड -बीड पासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून काल अखंड हरिनाम सप्ताहाला सुरू झाली असून काल चौथ्या दिवशी जिरेवाडी येथे ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले होते व तसेच ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यानी आपल्या किर्तनाने जिरेवाडीकरांना आणि परिसरातील नागरीकांना मंत्रमुग्ध करून सोडले याबाबत अधिक माहीती अशी कि शुक्रवारी रात्री ९ वाजता बीड पासून काही अतंरावर असलेल्या जिरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह निम्मित चौथ्या दिवसाची किर्तन सेवा ही ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्या किर्तनांने सुरू झाली होती व ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यानी हेची थोर भक्ती या अभंगावर खुप चांगल्या प्रकारे चिंतन करून जिरेवाडीकरांना व या अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी लावल्या श्रोंत्यांना मंत्रमुग्ध केले व तसेच ते म्हणाले की जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो, पण कुठल्याही प्रगतीपथावर चालायचे म्हटल्यावर संघर्ष करावाच लागतो.व सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने व प्रत्येक ठिकाणी स्पर्धा, संकट आहे. अशावेळी जो व्यक्ती समतोल वृत्तीने त्याला सामोरे जातो तिच व्यक्ती जीवनात यशस्वी होते.व
अंहकारमुक्त जीवनाची शिकवण सर्व संतांनी विश्वाला दिली. त्यामुळे कीर्तन, कथा, प्रवचने नुसती श्रवण करून चालणार नाहीत. त्यातील विचार आत्मसात करून तसे आचरण प्रत्येकाकडून व्हावे. त्यातून जीवनाची सार्थकता होईल, असे मौलिक विचार ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यांनी आपल्या किर्तनातून मांडले आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा