मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून राबणार्या शेतकर्यासोबत करावी
निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९
व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्त झाल आहे शेतकरी संपात स्वंयपुर्तीने सहभागी होत आहेत हा संप मागे घेण्यासाठी सरकारने मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले आहे परंतू मुख्यमंञी साहेब आश्वासन नको तर कुर्ती करा असे शेतकरी म्हणत आहेत महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात या शेतकरी संपाने अनेक बाजार समित्या ओस पडल्या आहेत या शेतकरी संपाच्या आदोंलनात राज्यातील 27संघटनांनी सहभाग नोंदवला आहे शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,शेतकर्यांच्या मालाला हमी द्यावा,शेतकर्याच्या पाल्याला मोफत वस्तीग्रह स्थापन करावेत,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात ,राज्यातील शेतकर्यांना प्रती महीना 5000रू पेश्नन द्या,शेतकर्यांना बि-बियाणामध्ये 50%दराने उपल्बध करा,शेतकरी विरोधी कायदे बंद करून शेतकर्याच्या हिताचे कायदे आमलांत आणावेत,
शेतकर्यानी पिकवलेल्या मालाला जागतिक स्तरावर बाजार पेठ मिळवून द्यावी ,या सह आदी मागण्यासाठी शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातत घेतले आहे आणि जो पर्यत सरकार शेतकर्याच्या मागण्या माण्य करत नाही तो पर्यत संप मागे घेणार नसल्याचे सागिंतले होते परंतू काही स्वंयघोषीत शेतकरी नेत्यानी मुख्यमंञ्यासोबत चर्चा करून संप मागे घेतल्याचे सागितले होते परंतू जो पर्यत सरकार शेतकर्याच्या मागण्या माण्य करत नाही तो पर्यत संप मागे घेणार नसल्याचे शेतकर्यानी सागितले आहे आणि मुख्यमंञी साहेब आश्वासन नको तर कुर्ती करा अस शेतकरी म्हणत आहेत महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात व शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आणि नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकऱ्यातून होत आहे त्यामुळे शेतकर्यानी हे शेतकरी संपा पाऊल उचलल असल्याच बोलल जात आहे
त्यामुळे सरकारने आश्वासन नाही तर कुर्ती करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हातील संपाचे हत्यार उपसले आहे आणि या शेतकरी संपाचा आजचा चौथा दिवस आहे शेतकर्याच्या शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप करत शेतकर्यांनी संपाच रूमण हातात घेतल आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा