मुख्य सामग्रीवर वगळा

परसबागेची चळवळ..

रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत.


 

ममताबाई भांगरे

आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे.
कळसुबाई शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उतार लक्षात घेऊन लावलेली विविध प्रकारची झाडे. बांधांवर पसरलेले काकडीचे वेल. सभोवताली तसेच घराच्या भिंतीवर पोहोचलेले दोडक्याचे वेल. कारल्याचा मांडव. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत अशीच विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, आंबा, अंजीर, पपई, शेवगा, सीताफळ, फणस, गावठी वांगी, टोमॅटो. एका बाजूला ओळीत केलेली वाल आणि घेवडय़ाची लागवड ही शांताबाई धांडे यांची परसबाग. या बागेमध्ये जमिनीचा उतार आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन फळझाडे, वेलवर्गीय भाज्या, कंदभाज्या, पालेभाज्या यांच्या लागवडी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत येथे काहीच नव्हते, खडक होता. जनावरे फिरायची. शांताबाई सांगत होत्या पण त्या छोटय़ाशा परसबागेतून हिंडताना त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा प्रश्न पडतो. या सर्व भाज्या स्थानिक आहेत. पारंपरिक बियाणांचाच त्यासाठी वापर केलेला आहे आणि सर्व भाजीपाला, फळांचा मुख्यत: घरीच वापर केला जातो. फारच उत्पन्न आले तर थोडीफार भाजी बाजारात नेली जाते पण तीही क्वचितच. गावरान वाणांबरोबरच खत म्हणून गांडूळ खत यांचा वापर होतो. पूर्वी महिना पंधरा दिवसांतून भाजी घरी आणली जायची. आता मात्र मुबलक प्रमाणात भाजी, फळे उपलब्ध होतात. शिवरात्रीपर्यंत बाहेरून भाजीपाला आणावा लागणार नाही. शांताबाईचे पती खंडू धांडे सांगत होते. दोन वर्षांपूर्वी ‘बायफ’च्या (भारतीय कृषि अनुसंधान) मार्गदर्शनाखाली परसबाग लावायला सुरुवात केली. सर्वच कुटुंब आता त्या बागेच्या प्रेमातच पडले आहे. या परसबागेचा गवगवा झाल्यामुळे आता दूरवरून लोक ही परसबाग पाहायला येतात. त्यात काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. शांताबाईंचा मुलगा सोमनाथ एम.ए. बी.एड. झालेला आहे. त्याला विचारले असता, आईचा खूप अभिमान वाटतो असे तो म्हणाला.
आंबेवंगणच्या पुढेच देवगाव नावाचे खेडे आहे. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची ही भूमी. रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई भांगरे यांचे घर आहे. कौलारू घर, पुढे बाजूला घरालगत पडवी. घरापुढे बोगन वेलीचा ऐसपस मांडव. ऑक्टोबरच्या कडक उन्हाची तिरीपही आत येऊ शकत नव्हती. प्रसन्न वातावरण. येथेही घराच्या सभोवताली असणाऱ्या इंचन् इंच जागेचा भाजीपाला, फळ लागवडीसाठी केलेला वापर. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर गेलेले वेल. बांधावर पसरलेले डांगर, भोपळा यांचे वेल. रताळ, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या पाहायला मिळाल्या. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा, कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी. जोडीला विविध फळांची झाडे. थोडय़ाफार पालेभाज्याही होत्या पण आम्हाला रानभाज्याच आवडतात असे ममताबाई सांगत होत्या. सासू-सासऱ्यांमुळे या रानभाज्यांचे ज्ञान झाले. सासूबाई असताना रानातून या भाज्या तोडून आणायचो, पण आता घराजवळच त्यांची लागवड केली आहे. चहा, साखर आणि तेल मीठ सोडले तर बाकी सर्व घरचेच वापरतो. धान्य, कडधान्य, भाज्या, हळद, मिरची सर्व काही. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत. गांडूळ खत, शेण खत यांचाच वापर केला जातो. सेंद्रीय व गांडूळ खतांच्या गोळ्या हा ममताबाईंचा स्वत:चा शोध. भातालाही त्या गांडूळ खतच वापरत पण ओढय़ालगतच्या शेतालगत टाकलेले खत वाहून जायचे. विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली. गांडूळ खताचे लहान लहान गोळे केले, वाळवले. युरिया ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर सुरू केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या शोधाची खूप प्रशंसा झाली. साधे नसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबाईंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे शांताबाई किंवा ममताबाई या दोघीही निरक्षर आहेत. पण ममताबाईंचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात. या दोघींप्रमाणेच मान्हेरेच्या हिराबाई गभाले, जायनावाडीच्या जनाबाई भांगरे, एकदरे येथील हैबतराव भांगरे यांच्याही परसबागा पाहण्यासारख्याच आहेत. ‘सीड क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरेंची परसबाग तर दृष्ट लागण्यासारखीच आहे. ही झाली प्रातिनिधिक उदाहरणे पण कळसुबाई शिखराच्या आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी खेडय़ांमध्ये अशा अनेक ममताबाई, शांताबाई पाहावयास मिळतात.
आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी ही परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनी गावरान वाणांचे जतन परंपरेने केले आहे. पूर्वी त्या घराभोवती डांगर, भोपळा, काकडी अशा भाज्या लावायच्या. पण त्या कुठेही लावल्या जायच्या. कुपोषणाची समस्या दूर करायची असेल तर आदिवासींना दर्जेदार, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. घराभोवतीच्या दोन-तीन गुंठे जागेत योग्य नियोजन करून परसबाग फुलवली तर चार-सहा महिने ताजा भाजीपाला रोजच्या आहारासाठी उपलब्ध होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ‘बायफ’ने परसबागेचा हा उपक्रम हाती घेतला. यात हंगामी परसबाग आणि बहुवर्षांयू परसबाग अशा दोन्ही प्रकारच्या परसबागांची लागवड केली जाते. सुरुवातीला स्थानिक भाजीपाल्यांचे विविध वाण एकत्र करून त्यांचे बियाणे संच (सीड कीट) तयार करण्यात आले. यामध्ये गावरान भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, गावठी काकडी, शेपू, पालक, मेथी, चाकवत, मुळा, करजकंद यांसारख्या वीस-बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध बियाणे पुरविण्यात आले. या बियाणांची वैशिष्टय़े म्हणजे हे स्थानिक वाण असल्याने एकदा पुरवठा केलेल्या बियांपासून तयार केलेल्या भाज्यांचा उपयोग पुढील हंगामासाठी होतो. हे स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे आहेच तसेच खाण्यासाठी रुचकरही आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या शेणखत, गांडूळ खत, कम्पोस्ट खताचा योग्य वापर करून या भाज्या पिकवल्या जातात. संस्थेच्या मार्गदर्शनामुळे या परसबागा अधिक सुबक व आहारदृष्टय़ा परिणामकारक ठरत आहेत. एका हंगामात सरासरी ४०० ते ६०० किलोपर्यंत ताजा भाजीपाला उत्पन्न होतो. वाहून जाणारे पाणी, सांडपाणी याचा काटेकोर वापर यासाठी केला जातो. बहुवर्षांयू भाजीपाला प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू, सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता अशी विविध फळझाडे घराच्या भोवती लावली जातात. मिळणाऱ्या फळांचा, फुलांचा आहारात वापर होतो. यातून रक्ताक्षय, कुपोषण कमी होण्यासाठी मदत होत आहे. तालुक्यातील ३१ गावांमधील अडीच हजारपेक्षा जास्त कुटुंबांसाठी ‘बायफ’ ने हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती ‘बायफ’चे अधिकारी जितीन साठे यांनी दिली. पण आज त्यापेक्षाही अधिक कुटुंबांकडे ही चळवळ पोहोचली आहे.  इथल्या परसबागातून तयार झालेले बियाणांचे संच राज्याच्या अन्य भागांतही पोहोचले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या वर्षी असे आठ ते दहा हजार बियाणे संच वितरीत करण्यात आले. आज राज्याच्या विविध भागांतून या योजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ येथे येत आहेत. प्रत्येक घराभोवती अशी परसबाग उभी राहिली तर कुपोषणाला आळा बसू शकतो, त्यासाठी घर तेथे परसबाग ही चळवळ राबविण्याची गरज आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स...
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा...
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य...
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्र...
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली...
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. ल...
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर...
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे...