मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ट्रेनमध्ये महिला प्रवाशांची दादागिरी, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मारहाण नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. विरार : विरार ट्रेन आणि दादागिरी हे जणू समीकरणच बनलं आहे. ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या टोळक्याची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. सीटवर बसण्याच्या कारणावरुन तीन महिला प्रवाशांनी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सपना मिश्रा (वय 19 वर्ष) असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बोईसर इथल्या थीमस इंजिनीअर कॉलेजमध्ये शिकते. नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. बुधवारी सकाळी विरार रेल्वे स्थानकातून 7.55 ची इंटरसिटी एक्स्प्रेस पकडून ती आईसोबत बोईसरला जात होती. परंतु सीटवर बसल्याच्या कारणावरुन तिला तीन महिला प्रवाशांनी मारहाण केली. लिसांनी तिचा जबाब नोंदवला असून चौकशी करुन महिलांविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं
देशभरातील शेतकऱ्यांचं 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते.   नवी दिल्ली :  सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारविरोधात राजधानीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी एकवटण्याचा निर्धार केला आहे. हमीभावासंदर्भात 20 नोव्हेंबरला देशभरातले शेतकरी दिल्लीत धडक देणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीनं हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप दिलं जाणार आहे.
कपाशीची प्रत राखा, भाव अधिक मिळवा! निलेश चाळक बीड - कापसाची प्रत राखण्याकरिता कपाशीची वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. व्यामुळे प्रतवारी करणे आवश्यक ठरते. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकरी सहसा कापूस बाजारात विकायला आणतो. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता कपाशीची वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणत: ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. या वेचण्यामध्ये चांगल्या प्रतिचा कापूस मिळतो. नंतरच्या वेचण्यामध्ये मिळालेला कापूस हलक्या प्रतिचा असतो. आपल्याकडे वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतक-यास त्याने उत्पादित केलेल्या कापसाला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रूईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, का...
भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक अधिकार पिकांचे नवीन वाण विकसित करणारे शास्त्रज्ञ यांच्या अधिकारांचे जतन करणे आवश्यक आहे. भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक अधिकार पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. शेतीचा विकास अधिक वेगाने होण्यासाठी तसेच पिकांचे नवीन वाण विकसित करण्यासाठी शेतकरी, तसेच पिकांचे नवीन वाण विकसित कर णारे शास्त्रज्ञ यांच्या अधिकारांचे जतन करणे आवश्यक आहे. या माध्यमातून बी-बियाणे तयार करणारे उद्योजक व त्यांचे उद्योग यांचा विकास होण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासदेखील मदत होईल. पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. भार...
परसबागेची चळवळ.. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत.     ममताबाई भांगरे आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे. कळसुबाई शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उ...
'मी फसवा लाभार्थी', गंडवून फोटो घेतलेल्या शेतकऱ्याची तक्रार शेतकऱ्यांना न विचारताच 'मी लाभार्थी' या जाहिरातीत त्यांचे फोटो छापल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुंबई :  तीन वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारने केलेल्या जाहिराती वादात सापडल्या आहेत. ‘आपलं सरकार, कामगिरी दमदार’चा नारा देणारं भाजप सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांना न विचारताच ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत त्यांचे फोटो छापल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जाहिरातीत शेतकऱ्यांना ज्या योजनांचा लाभ झाल्याचा दावा केला जात आहेत, त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाल्या आहेत. ‘मी लाभार्थी’, सरकारची जाहिरात पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवरी गावामधल्या शांताराम कटके यांची अवस्था ‘पोश्टर बॉईज’ या सिनेमातील ती नायकांसारखी झाली. नसबंदीच्या जाहिरातीसाठी त्यांचे फोटो कसे वापरले, ह्या गोष्टीची जशी नायकांना कल्पना नसते, तशीच काहीशी स्थिती शांताराम कटके यांची झाली आहे. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत आपला फोटो कसा आल...
पारनेर बलात्कार आणि हत्या प्रकरण, तीन जण दोषी या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालय अहमदनगर :  अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने 2014 सालच्या या प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. अहमदनगरला पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या तिघांवरही बलात्कार आणि हत्येसह सहा आरोप ठेवण्यात आले होते. काय आहे प्रकरण ? 22 ऑगस्ट 2014 साली लोणी मावळा गावात मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यावर घरी येताना अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. आरोपींना दोषी ठरवल्यानं...