बीडच्या हद्दीतील परंतू गेवराई मतदारसंघातील गावाकडे लोकप्रतिनीधींचे दुर्लंक्ष
निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा आ,लक्ष्मण पवारांना विसर
निलेश चाळक बीड-तालूक्याच्या हद्दीतील परंतू गेवराई मतदारसंघातील अनेक अनेक
गावात रस्ते ,नाल्या,व पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर आले
आहेत परंतू वारंवार तक्रारी करून सुध्दा लोकप्रतिनीधी या अडचणीकडे
दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे तर 2014-15ला झालेल्या
निवडणूकीत आ,लक्ष्मण पवारांनी या भागातील नागरीकांना विकासाची आश्वासने
दिली होती परंतू निवडणूकीनतंर आ,पवारांना आश्वासनाचा विसर पडलाय कि काय?अशी
चर्चा अनेक गावातील नागरीक करत आहेत
याबाबत आधिक माहीती अशी कि,बीड तालूक्याच्या हद्दीतील अनेक
गावे 2009-10च्या विधानसभा निवडणूकीत गेवराई मतदार संघात समाविष्ट करण्यात
आली होती परंतू आत्ता ही गावे विकासापासून कोसो दुर असल्याने या भागातील
नागरीकातून लोकप्रतिनीधीविरोधात त्रीव संताप व्यक्त केला जात आहे 2014-15ला
झालेल्या विधान सभा निवडणूकीत दोन्ही पंडीत एकाच व्यासपिठावर होते तर
गेवराई तालूक्याला लक्ष्मण पवार याच्या रूपांने एक खबिंर नेत्रत्व मिळेल
अशी आशा या बीडच्या हद्दीतील आणि गेवराई मतदारसंघातील मतदारांना होती त्या
मुळे आणि पतंप्रधान नरेंद्र मोदीच्या लाटेत मतदारांनी निवडणूकीत लक्ष्मण
पवार यांना विजयाची सर्वांधिक लिड देवून आपला खरा आणि सच्चा लोकप्रतिनीधी
म्हणून निवडूण आणले होते परंतू निवडूण आल्यानतंर याच आमदारांनी या गावातील
नागरीकांना विकास कामांची विवीध आश्वासने दिली होती आणि आत्ता आमदार
झाल्यानतंर या आमदार महोदयांनी या गावाकडे चक्क पाठ फिरवली असल्याची चर्चा
सुरू आहे बीडच्या हद्दीतील आणि गेवराई मतदारसंघातील अनेक गावात
रस्त्यांच्या समस्या आहेत तर अनेक ठिकाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी चागंले
रस्ते नसल्याने नागरीकांचे हाल होत आहेत आणि पाण्याची आणि आरोग्याची
समस्या ही ऐरणीवर आली आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुध्दा याकडे
लोकप्रतिनीधीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप याभागातील नागरीकांतून होत आहे
तर निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा आमदार लक्ष्मण पवारांना विसर पडलाय कि
काय ?अशी चर्चा या नागरीक करत आहेत
कार्य सम्राट आमदार हाच का तुमचा विकास?
गेवराई मतदारसंघातील आणि बीडच्या हद्दीतील अनेक गावात रस्ते नाल्या
नसल्याने नागरीकाचे हाल होत आहेत तर अनेक ठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेचा
प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे कार्यसम्राट आमदार हाच का तुमचा विकास असा
सवाल आत्ता नागरीकातून उपस्थित होत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा